Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Prakash Ambedkar

हडपसर मधून मोहम्मद अफरोज मुल्ला यांना उमेदवारी जाहीर

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात पुढील काही दिवसात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi-VBA) उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी वंचितने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. दरम्यान वंचित बहुजन आघाडीकडून आज दुसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. (Prakash Ambedkar)

https://www.instagram.com/p/DA5XTqzJM5G

वंचितने १० उमेदवारांची दुसरी यादी आज (दि.९) जाहीर केली आहे. मलकापूर, बाळापूर, परभणी, संभाजीनगर मध्य, गंगापूर, कल्याण पश्चिम, हडपसर (Hadapsar Assembly), माण, शिरोळ आणि सांगली या विधानसभा मतदारसंघासाठी वंचितने उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. सर्व उमेदवार मुस्लिम समाजाचे आहेत.

https://www.instagram.com/p/DA5T-bap9Lv

काँग्रेसचे माजी विधानपरिषद आमदार खातिव सैय्यद नातिकुद्दिन यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा देऊन बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. बाळापूर (जिल्हा,अकोला) विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/DA5SKXCJOeF

वंचितने जाहीर केलेले उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ खालीलप्रमाणे,

मलकापूर – शहजाद खान सलीम खान

बाळापूर – खातिब सय्यद नतीकउद्दीन

परभणी – सय्यद सलीम सय्यद साहेबजान

संभाजीनगर मध्य – मोहम्मद जावेद मोहम्मद इसाक

गंगापूर – सय्यद गुलाम नबी सय्यद

कल्याण पश्चिम – अयाझ गुलजार मोहवी

हडपसर – मोहम्मद अफरोज मुल्ला

माण – इम्तियाज जफर नदाफ

शिरोळ – अरिफ मोहम्मअली पटेल

सांगली – अल्लाउद्दीन ह्यातचंद काझी

https://www.instagram.com/p/DA5NGFMpQRd

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed