Maharashtra Politics | भाजप हायकमांड कडून एकनाथ शिंदेंना झुकतं माप? भाजपमध्ये खदखद; राजकीय वर्तुळात चर्चा

Amit-Shah-Ajit-Pawar-Eknath-Shinde-Devendra-Fadnavis

मुंबई : Maharashtra Politics | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली आहे. लोकसभेला भाजपला मोठा फटका बसला त्यामुळे आता भाजपने रणनीती आखत तयारी सुरु केली आहे. महायुती (Mahayuti News) म्हणून भाजप, शिंदे शिवसेना (Shivsena Shinde Group) आणि अजित पवारांची राष्ट्रवादी (Ajit Pawar NCP) हे तीन पक्ष एकत्रित आहेत.

https://www.instagram.com/p/DApufhdiIIq

दरम्यान आता आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे दौरे महाराष्ट्रात वाढले आहेत. मात्र भाजपपेक्षा शिंदेंच्या शिवसेनेला झुकते माप दिले जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावरुन भाजपमध्ये खदखद असल्याचे बोलले जात आहे.

https://www.instagram.com/p/DAps04UJ8or

एकनाथ शिंदे यांना झुकते माप दिले जात असल्यामुळे महाराष्ट्र भाजपामध्ये नाराजी आहे. मुंबई मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदीच्या हस्ते होणार आहे, त्याचा समारंभ आणि विधानसभेच्या निमित्ताने करण्यात येणारे शक्तीप्रदर्शन एकनाथ शिंदे यांच्या आग्रहामुळे ठाण्यात होणार आहे. मेट्रो ३ चा उद्घाटन सोहळा ठाण्यात घेतल्यामुळे भाजप नाराज आहे.

https://www.instagram.com/p/DApk8iAp7e3

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना मुंबई मेट्रो ३ प्रकल्पासाठी मेहनत घेतली होती. मविआकडून मेट्रो ३ प्रकल्पाला मोठा विरोध करण्यात आला होता. आरे कारशेडचे काम थांबलेही होते. देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प पुन्हा मार्गी लावला व त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले.

https://www.instagram.com/p/DApis5HiKOY

आता मोदी यांच्या हस्ते ५ ऑक्टोबरला उद्घाटन होणार आहे. दरम्यान, मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाचे श्रेय आणि त्यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याची संधी फडणवीस किंवा भाजपला मुंबईत मिळणार नाही. त्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर असल्याची माहिती मिळत आहे.

https://www.instagram.com/p/DApnifUJzzl

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed