Mumbai High Court News | रस्त्यावर विनयभंग ! मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर

Mumbai-High-Court

पुणे : येथील चतुःशृंगी पोलिस ठाण्यात (Chaturshringi Police Station) महिलेला मारहाण करून तीचा विनयभंग (Molestation Case) केल्या प्रकरणी दि. २०/०७/२०२४ रोजी गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात स्वप्नील अशोक केकरे (५८) व श्रीया स्वप्नील केकरे (५२, औंध पुणे) या पती-पत्नीला आरोपी केले आहे. स्वप्नील यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालय (Pune District Court) पुणे यांनी फेटाळला होता. तर श्रीया केकरे यांना जिल्हा न्यायालय पुणे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. जिल्हा न्यायालयाच्या निकाला विरोधात स्वप्नील यांनी ॲड. सत्यम हर्षद निंबाळकर (Adv. Satyam Harshad Nimbalkar) व ॲड. हर्षवर्धन मिलिंद पवार (Adv. Harshvardhan Milind Pawar) यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी (Anticipatory Bail) अर्ज केला होता. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनिष पितळे (Judge Manish Pitale) यांनी स्वप्नील केकरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

https://www.instagram.com/p/DAuvN86pSkF

दि. २०/०७/२०२४ रोजी फिर्यादी महिला दुचाकीवरून दोन लहान मुलांना घेऊन चालल्या होत्या. त्याच दरम्यान केकरे पती-पत्नी त्यांच्या होंडा सिटी कारमधून घरी चालले होते. प्रचंड प्रमाणात वाहतूक होती. दरम्यान फिर्यादी महिला व केकरे दांपत्यांमध्ये रस्त्यावर पुढे जाण्यावरून वाद झाला. त्यांच्यात बाचाबाची होऊन स्वप्नील केकरे हे हिंसक झाले व त्यांनी फिर्यादी महिलेच्या नाकावर जोरदार ठोसा मारला. नाकाचे हाड तुटून प्रचंड रक्तस्त्राव झाला. दरम्यान फिर्यादी महिलेच्या वाईट उद्देशाने छातीला हात लावून फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. संबंधित फिर्यादी महिला हि एका पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करते. त्यामुळे तीला ज्ञान असल्याने तीने तात्काळ घटनास्थळावरूनच सोशल मिडियावर लाईव्ह शुटिंग केले व मारहाणीचे दॄष्य सोशल नेटवर्किंगवर प्रसिद्ध केले. त्यामुळे तात्काळ पोलिस तेथे आले, प्रचंड प्रमाणात गर्दी जमा झाली. फिर्यादी महिलेने केकरे दांपत्याचा विरोधात फिर्याद दिली.

https://www.instagram.com/p/DAs31QFpwyR

मुंबई उच्च न्यायालयात ॲड.सत्यम हर्षद निंबाळकर व ॲड.हर्षवर्धन मिलिंद पवार यांनी युक्तिवाद केला की हि घटना भर रस्त्यावर वाहतूकीचच्या वेळी घडलेली आहे. मारहाणीचा किंवा विनयभंग करण्याचा उद्देश नव्हता. स्वप्नील केकरे यांनी सुध्दा संबंधित महिलेनेच मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. म्हणूनच संबंधित महिलेने खोटे आरोप करत खोटी फिर्याद दिली आहे.

https://www.instagram.com/p/DAswsxvJcNa

अटकपूर्व जामीन मंजूर करताना ऊच्य न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, फिर्यादी व आरोपी दोघेही आपापली चारचाकी व दुचाकी गाडी चालवत होते. त्यादरम्यान काही क्षणात हि घटना घडलेली दिसते. त्यामुळे मारामारी किंवा विनयभंग करण्याचा कुठला उद्देश किंवा ठरवून कटकारस्थान करून गुन्हा केला असल्याचे सकॄतदर्शनी दिसत नाही. फिर्यादी यांनी केलेले आरोप वाहतूकीच्या वेळी व रहदारीच्या वेळी कसे होऊ शकतील. त्यामुळे अशा गुन्ह्या मध्ये आरोपीला अटक करून तपास करण्याची आवश्यकता नाही. असे निरिक्षण नोंदवत जिल्हा न्यायालयाचा निकाल फिरवत स्वप्नील केकरे यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.

https://www.instagram.com/p/DAszSibCIQp

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Narhari Zirwal Jumps From Mantralaya | नरहरी झिरवळांसह इतर आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या; मंत्रालयात मोठा गोंधळ; जाणून घ्या (Video)

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed