Nilesh Rane-Shivsena Shinde Group | निलेश राणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार? विधानसभेसाठी पक्ष प्रवेशाचा तोडगा निघाल्याची माहिती
मुंबई : Nilesh Rane-Shivsena Shinde Group | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर जागावाटपाची चर्चा सुरु आहे. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेलाही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) असा सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान माजी खासदार निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
https://www.instagram.com/p/DApk8iAp7e3
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. या भेटीत कुडाळ विधानसभा मतदारसंघावर (Kudal Assembly Constituency) राणे कुटुंबीयांनी दावा केला आहे. तर महायुतीतील जागावाटपात (Mahayuti Seat Sharing Formula) कुडाळ विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेकडून कुडाळ-मालवणचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.
https://www.instagram.com/p/DApnifUJzzl
आज नारायण राणे आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत निलेश राणेंच्या प्रवेशासंदर्भात चर्चा झाली. त्यावर पक्ष प्रवेशाचा हा तोडगा निघाल्याची माहिती मिळाली आहे. निलेश राणे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Nilesh Rane-Shivsena Shinde Group)
https://www.instagram.com/p/DApis5HiKOY
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’