Nisarg Chhaya Bhugaon | आजी आजोबांनी लुटला गरबा आणि दांडिया खेळण्याचा मनमुराद आनंद ! निसर्ग छाया यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी नवरात्रीनिमित्त विशेष आयोजन

Garba Dance

पुणे : Nisarg Chhaya Bhugaon | आयुष्यभर मुलांसाठी जगताना ते स्वत: मात्र जगणे विसरुन जातात. आयुष्याच्या उत्तरार्धात येता येता स्वत:साठी जगायला वेळ तर मिळतो, परंतु शारीरीक मर्यादा ही येतात. अशा वेळी विविध व्याधींमुळे सगळ्यांसोबत बाहेर गर्दीमध्ये जाऊन उत्सवाचा आनंद घेता येत नाही. अशा समवयस्क ज्येष्ठ नागरीकांसाठी नवरात्रीनिमित्त विशेष गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. आयुष्याची सायंकाळ आनंदाने जगू पाहणाऱ्या ज्येष्ठांनी कार्यक्रमात दांडिया मनमुराद आनंद लुटला.

https://www.instagram.com/p/DA3M-sLJK_7

निसर्ग छाया संस्थेच्या वतीने भूगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर, मंदार देवगावकर, जयंत दशपुत्रे, मकरंद टिल्लू आदी उपस्थित होते.

https://www.instagram.com/p/DA3OOagJN8a

नगाड़ा संग ढोल बाजे…सबसे बडा तेरा नाम शेरोवाली… ढोलीडा… ‘उड़ी उड़ी जाए’… पंखीडा… सनेडो…पंखिडा ओ पंखिडा… रंगीलो म्हारो ढोलना या गाण्यांवर दांडिया खेळण्याचा मनमुराद आनंद ज्येष्ठ नागरिकांनी लुटला.

https://www.instagram.com/p/DA3VDZZJdqF

चंद्रकांत पाटील म्हणाले, पोटानंतर, मनाची आणि त्यानंतर बुद्धीचा भूक असते. या सगळ्यानंतर आत्म्याची भूक निर्माण होते. त्यामुळे आयुष्याच्या उत्तरार्धात ज्येष्ठ नागरिकांनी हताश होऊन न बसता, बाहेर पडून आयुष्याचा मनसोक्त आनंद घ्यायला हवा.

https://www.instagram.com/p/DA26NBFpBhU

अमृता देवगावकर म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांना नवरात्रीमध्ये बाहेर गर्दीत जाऊन दांडिया खेळण्याचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या पद्धतीने मनसोक्त आनंद घेत आपल्याच वयाच्या मित्रमैत्रिणींसोबत दांडिया गरबा खेळता यावा यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

https://www.instagram.com/p/DA2Yd6wJqSr

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed