Nobel Prize 2024 | फिजिक्समधील नोबेल पुरस्कार जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटन यांना जाहीर

Nobel Prize 2024

पुणेरी आवाज – Nobel Prize 2024 | यावर्षीचा फिजिक्स नोबेल पुरस्कार 2024 जॉन जे. हॉपफिल्ड आणि जेफ्री ई. हिंटन यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना ‘ कृत्रिम न्यूरल नेटवर्कसह मशीन शिक्षण सक्षम करणार्या पायाभूत शोधांसाठी’ घोषित करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/DA210j7JyoM

रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ फिजिक्सच्या सदस्यांची आज बैठक झाली. त्यामध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. सोमवारी वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेचे व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रूवकुन यांना जाहीर करण्यात आले होते. दोघांना मायक्रो आरएनएच्या शोधासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

https://www.instagram.com/p/DA20O3LpWwm

यासाठी दिला जातो नोबेल पुरस्कार

स्वीडनचे संशोधक अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्युपत्रानुसार या पुरस्काराचे गठन केले. त्यांनी त्यांची संपत्ती यासाठी दिलेली आहे. नोबेल स्वीडनमधील रसायनशास्त्रज्ञ, अभियंते आणि उद्योगपती होते. डायनामाईटचा शोध त्यांनी लावला होता. त्यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1833ला झाला तर मृत्यू 1896ला झाला. त्यानंतर पहिला नोबेल पुरस्कार 10 डिसेंबर 1901ला देण्यात आला. हा पुरस्कार पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांसाठी दिला जातो. विज्ञानातील पुरस्कार हे या वर्षांतील मानवजातीच्या लाभासाठीच्या सर्वोत्तम संशोधनाला दिले जातात तर शांततेचा पुरस्कार हा देशांदेशांतील मैत्री वाढवण्यासाठी, शांततेच्या प्रसारासाठी केलेल्या प्रयत्नांना दिला जातो.

https://www.instagram.com/p/DA2uCK0ijzv

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed