Parihar Chowk Aundh Pune News | परिहार चौकातील बेकायदा गाळ्यांना अधिकार्यांचाच ‘वरदहस्त’ ! महापालिका आयुक्तांनी चौकशी समिती नेमल्याने खळबळ
पुणे : Parihar Chowk Aundh Pune News | औंध येथील परिहार चौकालगतच्या पदपथावर बेकायदेशीररित्या उभारलेले ३० गाळे अतिक्रमण विभागाने (PMC Encroachment Department) काल पाडून टाकले. विशेष असे की हे गाळे प्रशासनातील अधिकार्यांच्याच ‘वरदहस्ता’मुळे उभारल्याचे निदर्शनास आल्याने याप्रकरणी चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नियुक्ती करण्यात आल्याने महापालिकेत (Pune Municipal Corporation-PMC) खळबळ उडाली आहे.
https://www.instagram.com/p/DAsIFbJJplU
औंध येथील परिहार चौकालगत असलेल्या पदपथावर महापालिकेने शिवदत्त मित्र मंडळाला भाजी मंडईसाठी जागा दिली होती. २००२ मध्ये दिलेल्या या जागेचा २०१३ मध्ये करार संपला होता. परंतू राजकिय आणि प्रशासनातील अधिकार्यांच्या वरदहस्तामुळे याठिकाणी भाजी मंडईऐवजी तब्बल ३० टपर्या थाटल्या गेल्या. एवढेच नव्हे तर करार संपल्यानंतर याठिकाणी पदपथावरच बांधीव मार्केट उभारले गेले. वाढत्या रहदारीमुळे नागरिकांना रस्त्यांवरूनच जीव मुठीत धरून चालावे लागत असल्याने तक्रारी वाढल्या होत्या.
https://www.instagram.com/p/DAsM1hDpeUd
स्थानीक नगरसेविका अर्चना मुसळे (Archana Musale) आणि त्यांचे पति ऍड. मधुकर मुसळे (Adv Madhukar Musale) यांनी या विरोधात महापालिका प्रशासनाकडे मागील काही महिने सातत्याने तक्रारी करत पाठपुरावा केला. नागरिकांना सोबत घेउन आंदोलनेही केली. मात्र यानंतरही प्रशासनातील अधिकार्यांनी संबधित स्टॉलधारकांमागे पाठबळ उभे केले. मुसळे दांम्पत्याने अखेर तीन दिवस अगोदर महापालिकेसमोरच आंदोलन केले. यानंतर वरिष्ठ पातळीवर याची दखल घेउन तपासणी करण्यात आली. यामध्ये हे गाळे बेकायदाच असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी ते पाडून टाकण्याचे आदेश दिले. अतिक्रमण विभागाचा नव्याने पदभार स्वीकारलेले उपायुक्त सोमनाथ बनकर (Somnath Bankar) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पोलिस बंदोबस्तात हे गाळे पाडून टाकण्यात आले.
https://www.instagram.com/p/DAsKJoRpeVn
याप्रकरणाची महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांनी गंभीर दखल घेतली आहे. करार संपल्यानंतरही एवढा काळ गाळेधारकांना कोणी अभय दिले. गाळे नियमीत करण्यासाठी कोणी प्रयत्न केले, यामध्ये काही व्यवहार झाले का? याची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. पृथ्वीराज बी.पी. (Prithviraj B P IAS) यांनी या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली असून लवकरच चौकशीचा अहवाल आयुक्तांना सादर करण्यात येईल, अशी माहिती दिली. (Parihar Chowk Aundh Pune News)
https://www.instagram.com/p/DAqzXKzCEbo
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’