Politics News | हरियाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती तोडलेल्या पक्षांची वाताहत; BJP प्रादेशिक पक्ष संपवत असल्याची चर्चा; महाराष्ट्रात काय होणार?

पुणेरी आवाज – Politics News | हरियाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीत भले ही भाजपच्या जागा वाढल्या असतील परंतु, या पक्षा बरोबर युतीत राहिलेल्या आणि नंतर युती तोडलेल्या पक्षांची वाताहत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजप प्रादेशिक पक्षांशी युती करून त्यांना संपवत असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
https://www.instagram.com/p/DA2Yd6wJqSr
हरियाणाच्या मागच्या म्हणजे 2019 च्या निवडणुकीत भाजपनं 40 जागा जिकंल्या होत्या. बहुमताचा आकडा 46 असल्यानं दुष्यंत चौटाला यांच्या जेपीपीला महत्व प्राप्त झाले. पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या जेजेपीचे 10 उमेदावार विजयी झाले होते. चौटाला यांनी भाजपा सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि नव्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाले. परंतू लोकसभा निवडणुकीवेळी त्यांची भाजप सोबतची युती तुटली. या विधानसभा निवडणुकीत जेजेपीची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाली आहे. ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा चौटाला यांचा निर्णय जनतेला रूचलेला नाही किंवा तो चुकीचा ठरलेला आहे.
https://www.instagram.com/p/DA2hWR1pZz3
पीडीपीला देखील धक्का
दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपीला देखील धक्का बसला आहे. भाजपचा मित्र पक्ष राहिलेल्या पीडीपीला 28 वरून केवळ 4 जागांवर आघाडी मिळाली आहे. गेल्यावेळेस भाजप आणि पीडीपीनं राजकीय सोय म्हणून विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन केलं. भाजपच्या मदतीनं मेहबूबा मुफ्ती मुख्यमंत्री झाल्या खर्या परंतू त्यांच्या पक्षाला प्रचंड अडचणी आल्या.
https://www.instagram.com/p/DA2ivy9ItUq
महाराष्ट्रात काय होणार?
हरियाणा आणि जम्मू-कश्मीरच्या निकालांवरून आता महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीचा विचार केला जात आहे. राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत की, भाजपं प्रादेशिक पक्षांसोबत युती करतो. मग त्यांच्या मदतीनं राज्यात पाळमुळं रूजवतो. मग हळूहळू आपल्याच मित्रांना कमकुवत करतो. यासाठी उदाहरण द्यायचेच झाले तर शिरोमणी अकाली दल, शिवसेना पक्ष. आता याच पक्षांच्या यादीत पीडीपी आणि जेपीपी या पक्षांची भर पडली आहे. जसं पीडीपीच्या मुफ्ती, जेपीपीचे चौटाला भाजपसोबत जाऊन अनुक्रमे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झाले होते तसचं काहीसं महाराष्ट्रात देखील घडलं आहे. आता लवकरच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक देखील होणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रात भाजपबरोबर गेलेल्या आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालेल्या नेत्यांचे भविष्य काय असणारं याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
https://www.instagram.com/p/DA2lQsPis6x
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’