Pune BJP News | भाजपा पुणे शहर ‘उद्योग आघाडी’च्या अध्यक्षपदी मंदार देवगांवकर यांची निवड

Pune BJP News | Mandar Devgaonkar has been elected as the president of BJP Pune city's 'Industry Front'

पुणे : Pune BJP News | भारतीय जनता पार्टी पुणे शहर ‘उद्योग आणि पायाभूत सुविधा आघाडी’च्या अध्यक्षपदी मंदार देवगांवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे पुणे शहराध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी नुकतेच त्यांना या नियुक्तीचे अधिकृत पत्र प्रदान केले. 

यावेळी भाजप पुणे शहर सरचिटणीस दीपक पोटे, सुशील मेंगडे, पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, नगरसेविका प्रियंका शेडगे, नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील देवगांवकर यांचा दांडगा अनुभव लक्षात घेता, पुणे शहरात पक्षाचा संघटनात्मक विस्तार आणि पक्षबांधणी करण्यासाठी त्यांची ही निवड उपयुक्त ठरेल, असा विश्वास धीरज घाटे यांनी व्यक्त केला.

या निवडीबद्दल मंदार देवगांवकर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या भावी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शहराध्यक्षांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

You may have missed