Pune Crime Court News | लाच घेणार्या जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायकाला 3 वर्षाच्या कारावासाची शिक्षा
पुणे : Pune Crime Court News | कनिष्ठ लिपिक पदाची वैयक्ति मान्यतेची फाईल तयार करुन वरिष्ठांकडे सादर करण्यासाठी लाच घेणार्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायकाला न्यायालयाने ३ वर्षांची सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
गिरीशचंद्र सुदामराव वाघमारे Girishchandra Sudamrao Waghmare (रा. नालंदानगर, विजापूर रोड, सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. वाघमारे हे सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग (माध्यमिक) येथे वरिष्ठ सहायक म्हणून कार्यरत होते. ही घटना २०२१ मध्ये घडली होती. तक्रारदार यांचे कनिष्ठ लिपिक पदाची वैयक्तिक मान्यतेची फाईल तयार करुन वरिष्ठांकडे सादर करण्यासाठी वाघमारे याने ८५०० रुपयांची लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी करुन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून गिरीशचंद्र वाघमारे याला पकडण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करुन तत्त्कालीन पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांनी आरोपीविरुद्ध सोलापूर विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची जिल्हा न्यायाधीश डी एन सुरवसे यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायाधीश सुरवसे यांनी वाघमारे याला दोषी ठरवुन ३ वर्षे सक्षम कारावास व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने सक्षम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. प्रकाश जन्नू तर आरोपीतर्फे अॅड. सुरेश पाटील कुरुलकर यांनी काम पाहिले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून पोलीस अंमलदार मधुमती शिंदे, गायकवाड यांनी काम पाहिले.
