Pune Crime News | पुणे: बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक; गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त

Pune Crime News | Pune: Two arrested, including a seasoned criminal, for carrying an illegal pistol; homemade gun and two live cartridges seized

पुणे: Pune Crime News | बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेच्या युनिट 3 च्या पथकाने दोन तरुणांना अटक केली आहे. आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्यांची नावे रोहन सुरेश राठोड Rohan Suresh Rathod (वय 21, रा. नांदेड गाव, पुणे) आणि ओंकार सचिन मोरे Omkar Sachin More (वय 23, रा. कोथरूड, पुणे) अशी आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक सोमवारी सिंहगड रस्ता, नांदेड आणि नांदेड सिटी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत प्रतिबंधात्मक गस्त घालत होते. त्यावेळी रोहन राठोड हा नांदेड गावातील स्मशानभूमीच्या पार्किंगजवळ थांबला असून त्याच्याकडे बेकायदा पिस्तूल आणि काडतुसे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

यानंतर पोलिसांनी सापळा रचून रोहनला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हे पिस्तूल ओंकार मोरेकडून विकत घेतल्याचे सांगितल्याचा दावा पोलिसांनी केला. त्यानुसार ओंकार मोरेलाही अटक करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, ओंकार मोरे हा पोलिसांच्या नोंदीवरील आरोपी असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 3 च्या पथकाने केली.

You may have missed