Pune Crime News | व्यापार्‍याची 22 लाखांची फसवणूक करणार्‍या व्यावसायिकावर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | टांझानिया येथे ओले  काजू पाठविण्यासाठी ऑर्डर दिली असताना हलक्या दर्जाचा माल पाठविल्याने तो व्यवहार रद्द केला. दिलेले पैसे परत मागितले असताना ते परत न करुन २२ लाख २१ हजार ७०० रुपयांची फसवणुक केल्याच्या आरोपावरुन व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला आहे़

याबाबत जगन्नाथ माधव साहु (वय ३९, रा. माहूपादर, शेरगडा, गंजम ओडिशा) यांनी येवलेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मिलिंद रवींद्र नाशिककर (Milind Ravindra Nashikkar) आणि आशिष बबनराव घुले Ashish Babanrao Ghule (दोघे रा. शाम विहार, गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गोकुळनगर येथे २४ फेब्रुवारी २०२६ रोजी घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगन्नाथ साहू यांचा  मोठा भाऊ सिबाराम साहू हे कलर ग्राफिक्स इम्पोर्ट एक्स्पोर्ट, अंतर्गत टांझानिया येथे ओल्या काजूचा व्यवसाय करतात. त्यांनी टांझानिया ते विशाखापट्टणम १० कंटेनर ओला काजू निर्यात करण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना ९५ लाख रुपये दिले होते. मात्र १० कंटेनर माल निर्यात करण्या ऐवजी या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी अवघ्या ७२ लाख ५४ हजार रुपये किंमतीचा अत्यंत हलक्या दर्जाचा ओला काजू २ कंटेनर तमिळनाडुतील तुतिकोरिन बंदर येथे पाठवला. माल अत्यंत हलक्या दर्जाचा असल्याने सिबाराम साहू यांनी हा व्यवहार  रद्द केला व उर्वरित २२ लाख २१ हजार ७०० रुपये परत मागितले. आरोपी यांनी त्यांचे पैसे परत केले नाहीत़  त्यामुळे शेवटी त्यांनी आपला भाऊ जगन्नाथ साहू यांना पुण्यात पाठवुन फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक शिरोळे तपास करीत आहेत.

You may have missed