Pune Crime News | दम मारो दम ! हुक्काच काय दारु, बियरही येथे मिळते खुलेआम; दरीपुलाजवळील हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे दारुची विक्री
पुणे : Pune Crime News | हुक्का पिण्यास बंदी आहे़ आणि परवान्याशिवाय बिअर, दारुची विक्री करता येत नाही. परंतु, दरीपुलाजवळील (Dari Pool Pune) हॉटेलमध्ये कोणत्याही परवान्याशिवाय दारु, बियर मिळते इतकेच काय हुक्काही खुले आममपणे ओढला जात असल्याचे दिसून आले. भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) ७ मिराकल हॉटेलवर (7 Miracle- Lakeside Lounge & Restro) कारवाई केली आहे.
https://www.instagram.com/p/DAps04UJ8or
पोलीस अंमलदार निलेश विलास खैरमोडे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी यश पांडुरंग पवार (वय २५, रा. कात्रज कोंढवा रोड, विद्यानगर, कात्रज) आणि सिद्धार्थ बाळासाहेब कामेरीकर (वय २७, रा. विश्वभारती अपार्टमेंट, धनकवडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
https://www.instagram.com/p/DApz4Y9Jhpe
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी (PSI Nilesh Mokashi), पोलीस हवालदार देशमुख, महांगरे, पोलीस अंमलदार शेडगे, सरपाले हे अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी १ ऑक्टोबर रोजी पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग करत ते ७ मिराकल हॉटेलचे बाहेरील बाजुला आले. त्यावेळी त्यांना हॉटेलमधून हुक्का सदृश्य मालाचा वास येऊ लागला. त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन पाहिले तर एका रुममधील हुक्क्याचा वास येत होता. त्यांनी आत जाऊन पाहिले तर रुममध्ये एक जण हुक्का पित बसला होता. टेबलावर अनेक फ्लेवर्स, हुक्का पॉट ठेवले होते. टेबलाच्या बाजूला बियर व दारुच्या बाटल्या ठेवल्या होत्या. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांनी तेथील तरुणाला विचारल्यावर त्याने आपले नाव सिद्धार्थ कामेरीकर असे सांगितले.
https://www.instagram.com/p/DApyBl5pOiN
कोणताही परवाना नसताना हुक्का, बिअर, दारुच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवलेल्या आढळून आल्या. पोलिसांनी हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर्स, बियर बाटल्या, रॉयल चॉलेंज दारुच्या बाटल्या असा ११ हजार ४९५ रुपयांचा माल जप्त केला. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करीत आहेत. (Pune Crime News)
https://www.instagram.com/p/DApk8iAp7e3
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’