Pune Crime News | पूनर्वसन सेंटरची बदनामी करण्याची भिती दाखवून खंडणी उकळली; छावा संघटनेच्या सचिन भिसेसह सहा जणांवर गुन्हा दाखल, अनुप लोखंडे आत्महत्या प्रकरण

Extortion

पुणे : Pune Crime News | अंमली पदार्थाची सवय सोडविण्यासाठी उपचार व पुनर्वसन सेंटरमध्ये उपचाराला दाखल केलेल्या तरुणाने आत्महत्या केली. यावरुन छावा संघटनेच्या (Chhava Sanghatna) सचिन भिसे (Sachin Bhise) व इतरांनी ७० लाख रुपयांची मागणी केली. उपचार व पुनर्वसन सेंटरबाहेर आंदोलन करुन बदनामी करण्याची धमकी देऊन ३ लाख रुपये खंडणी स्वीकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Extortion Case)

https://www.instagram.com/p/DA2ivy9ItUq

याप्रकरणी डॉ. नितीन विरसिंग दलाया (वय ५९, रा. बाणेर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी सचिन भिसे (रा. वाकड), रिना आडागळे (रा. ताडीवाला रोड) आणि अन्य चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शास्त्री रोडवरील सॅफ्रॉन हॉटेल व इतर ठिकाणी २८ सप्टेबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान घडला आहे.

https://www.instagram.com/p/DA2hWR1pZz3

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे नित्यानंद व्यसनमुक्ती केंद्र आहे. या केंद्रात अनुप लोखंडे याला भरती करण्यात आले होते. त्याने ६ ऑगस्ट २०२४ रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणाचे कारण सांगून सचिन भिसे व इतरांनी ७० लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम नाही दिल्यास ते फिर्यादीच्या विरोधात खोटा गुन्हा नोंद करतील. तसेच त्यांचे उपचार व पूनर्वसन केंद्राबाहेर सचिन भिसे चालवत असलेल्या छावा संघटनेमार्फत पुणे, नाशिक, नगर, बीड, लातूर, इगतपुरी येथून २ हजार लोकांना गोळा करुन आंदोलन करतील.

https://www.instagram.com/p/DA2essiCjTQ

फिर्यादी व त्यांचे केंद्राची बदनामी करुन उपचार व पूनर्वसन केंद्रे बंद करतील, अशी धमकी वेळोवेळी देऊन फिर्यादी यांच्याकडून ३ लाख रुपयांची खंडणी स्वीकारली. वेळोवेळी फोनद्वारे संपर्क साधून फिर्यादी यांना विविध कारणाने दमदाटी करत अधिक रुपयांची मागणी करत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत. (Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DA2Yd6wJqSr

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed