Pune Crime News | भीक मागण्यासाठी बसण्यावरुन भांडणे ! तेल वाहण्याचा दगड डोक्यात घालून केले बेशुद्ध, शनि मंदिरासमोरील घटना
पुणे : Pune Crime News | शनि मंदिराबाहेर (Shani Mandir Pune) भीक मागण्यासाठी बसण्यावरुन दोघांमध्ये भांडणे झाली. त्यात एकाने शनि मंदिरासमोर तेल वाहण्यासाठी ठेवलेला दगड डोक्यात घालून दुसर्याला बेशुद्ध केले.
https://www.instagram.com/p/DApwR78iMX4
फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police Station) दिगंबर सिद्ध खांडेकर (वय ६१, रा. कसबा पेठ मुळ रा. तिसंगी, पो़. सोनकर ता. पंढरपूर, जि. सोलापूर) याला अटक केली आहे. या घटनेत जखमी झालेली व्यक्ती ५० ते ५५ वर्षांची असून ती अद्याप बेशुद्ध असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ही घटना बुधवारी सकाळी अकरा वाजता घडली.
https://www.instagram.com/p/DApz4Y9Jhpe
याबाबत पोलीस हवालदार मच्छिंद्र दादु खरात यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवार वाड्यासमोरील शनि मंदिराबाहेर अनेक जण भीक मागण्यासाठी बसत असतात. दिगंबर खांडेकर आणि जखमी व्यक्ती यांच्यात जागेवर बसण्याच्या कारणावरुन वाद झाला. तेव्हा खांडेकर याने तुला आज सोडत नाही, खल्लासच करतो,असे म्हणून शिवीगाळ केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने शनि मंदिरासमोर तेल वाहण्यासाठी ठेवलेला दगडाने त्याचे डोक्यात व तोंडांचे समोरील बाजूला मारुन गंभीर जखमी केले. या घटनेत ती व्यक्ती बेशुद्ध पडली. पोलिसांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. सहायक पोलीस निरीक्षक शेख तपास करीत आहेत. (Pune Crime News)
https://www.instagram.com/p/DAps04UJ8or
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’