Pune Crime News | ‘पाचशे कमी दिले, तसेच मी एकाला दिलते, झाली ना बोंब, मला खाली बघावं लागल ना त्यात’ पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता यांना ‘पंचवीस के’ सांगून दिले केवळ साडेसात हजार, लाच देतानाही केली फसवणूक
पुणे / पिंपरी चिंचवड : Pune Crime News | तक्रारदार यांच्या ५ टेंडरबाबत करारासाठी बिलाच्या रक्कमेच्या ०.५ टक्के लाच मागितल्याप्रकरणी पिंपरी चिचंवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २९ ऑक्टोंबर रोजी अटक केली. न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या लाच मागणीची पडताळणी करताना प्रमोद ओंबासे यांना एकाने लाच देताना चक्क टोपी घातली होती. तर, याच तक्रारदाराने या आधी दिलेल्या लाचेच्या रक्कमेत ५०० रुपये कमी दिल्याने त्यांना मिक्सर घेताना खाली पाहण्याची वेळ आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरुन प्रमोद ओंबासे यांना लाच घेण्याची सवय असल्याचे दिसून आले आहे.
प्रमोद ओंबासे यांना अटक केल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या निगडीच्या घरी सर्च घेतला. त्यात त्यांच्या घरी जवळपास सव्वा लाख रुपयांची रोकड, दागिने, २ मजली घर, काही मालमत्तेची कागदपत्रे असा जवळपास २ कोटी १४ लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे दिसून आले आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाच मागणीची तक्रार आल्यानंतर पंचांसमवेत ११ जून २०२६ रोजी लाच पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तक्रारदार व पंच यांनी प्रमोद ओंबासे यांची त्यांच्या केबिनमध्ये भेट घेतली. त्यावेळी प्रमोद ओंबासे यांनी किती आहेत, असे विचारले. तक्रारदार यांनी पाच टेंडरच्या फाईलपैकी तीन फाईलच्या कामाच्या एकूण ३८ लाख रक्कमेच्या ०.५ टक्के प्रमाणे १९ हजार होतात़, असे बोलले असता ओंबासे यांनी रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शविली. त्यानंतर त्यांनी समोरील फाईलवर सह्या केल्या. तेव्हा तक्रारदार याने ‘‘सर पण आता नायत उद्या, आता नायत पैसे, असे म्हणाले. तेव्हा प्रमोद ओंबासे ‘‘है का’’ असे म्हणून हाताने काय हे,असे हावभाव करतात. त्यावर पुन्हा तक्रारदार हे ‘उद्या देतो साहेब’ असे म्हणाले. तेव्हा रवींद्र गौड म्हणाले, मी म्हणलो ‘साहेबांना भेटा’, त्यावर ओंबासे हे रवींद्र गौड यांच्याकडे पहात ‘तुझी जबाबदारी’ असे म्हणाले. गौड ‘ठीके’ असे म्हणाले. तक्रारदार यांनी ‘उद्या देतो मी’ असे म्हणाले.
त्यानंतर ओंबासे यांनी तक्रारदार यांनी यापूर्वी दिलेल्या रक्कमेमध्ये ५०० रुपये कमी दिलेले होते अशी बोलणी झाली. ओंबासे यांना तक्रारदारांनी यापूर्वी घेतलेल्या एका ६ लाखाच्या टेंडरच्या बिलावेळी ६ हजार दिली होती. त्याबाबत ओंबासे हे तक्रारदाराला म्हणाले की, साडेसहा तु आणले का, तू हो म्हणाला अन टाकले त्याच्यात़.. तसेच मी एकाला दिलते़.. झाली ना बोंब, तो म्हणाला साहेब पाचशे कमी येत त्यात़.. मिक्सर घेतला़.. मला खाली बघाव लागल की नाय़़ तू पाचशे़.. साडेपाच जरी दिले असते, तरी मला चालतय.. तुझ्या भरोशावर मी तशाच तस दिलं.. (तक्रारदार यांना तो कोण ते कळल नाही़) त्यामुळे कागदावर मी लिहतो़, एकानं ‘पंचवीस के’ लिहलय बंर का, म्हणजे पंचवीस हजाऱ. साडेसातच निघाले त्याच्यात, चुकीच आहे ना, सांग बंर, असे ओंबासे यांनी सांगितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले आहे.
या दरम्यान, आणखी दोन फाईलबाबत पुन्हा पडताळणी करण्याचे ठरले होते. परंतु, अजय सूर्यवंशी यांनी दोन फाईलवर अगोदरच सह्या करुन त्या प्रमोद ओंबासे यांच्या केबिनमध्ये ठेवल्या. प्रमोद ओंबासे यांनी त्यावर सह्या केल्या.
त्यानंतर ३० सप्टेंबर २०२६ रोजी तक्रारदार लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात आले. त्यांनी सांगितले की, ९ सप्टेंबर २०२६ रोजीपासून ओंबासे यांच्याकडून पाणी पुरवठा विभागाचा चार्ज काढून घेतला आहे. तसेच पडताळणी दरम्यान ओंबासे यांच्याकडून पाचही फाईलवर सह्या केलेल्या आहेत. सध्या फाईल प्रलंबित नाही. ओंबासे यांच्याकडून पाणीपुरवठा विभागाचा चार्ज काढून घेतल्याने ते भविष्यात करारनाम्यावर केलेल्या सह्यांचे मोबदल्यात लाच मागणी केलेली रक्कम स्वीकारतील, असे वाटत नाही. त्यामुळे ही पडताळणी कारवाई स्थगित करण्यात यावी.
प्रमोद ओंबासे यांनी लाचेची मागणी केल्याचे लाच पडताळणीत निष्पन्न झाल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली आहे.
