Pune Crime News | राजीव गांधी हॉस्पिटल मधील डायग्नोस्टिक सेंटरच्या एमआरआय मशीनची कॉपर वायर कापून नेणार्‍या चोरांच्या लक्ष्मीनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Pune Crime News | Laxmi Nagar police nab thieves who cut copper wire of MRI machine of diagnostic center in Rajiv Gandhi Hospital

पुणे : Pune Crime News | राजीव गांधी हॉस्पिटल मधील भारत डायग्नोस्टिक सेंटरच्या एमआरआय मशिनची कॉपर वायर कापून नेणार्‍या चोरट्यांना लक्ष्मीनगर पोलिसांनी २४ तासाच्या आत जेरबंद केले.

दिनेश भगवान साळवे Dinesh Bhagwan Salve (वय २२, रा. यशवंतनगर, येरवडा), बद्रुजमान जिहाउल शेख Badruzzaman Jihaul Shaikh (वय २४, रा. ताडीगुुत्ता, येरवडा), अब्राहिम नरेश यादव Ibrahim Naresh Yadav (वय २०, रा. ताडीगुत्ता, येरवडा), आणि सचिन सुरेश गवळी ऊर्फ गोलड्या (वय ३६, रा. ताडीगुत्ता, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत चेतन मोहन रावळ (वय ३८, रा. सोहरब रेसिडेन्सी, ताडीवाला रोड) यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये भारत डायग्नोस्टिक सेंटर यांचे एमआरआय मशीन आहे. मशीनची कॉपरची वायर भिंतीच्या बाहेर आलेली होती. चोरट्यांनी ती वायर कापून आतून ओढून बाहेर काढली. सुमारे ३० मीटरची कॉपरची वायर चोरुन नेली होती. हा प्रकार ५ एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आला. एमआरआय मशीनची वायर चोरीला गेल्याने त्यांचे काम बंद पडले. त्यामुळे अनेक रुग्णांचा खोळंबा झाला होता. या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र कदम व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस अंमलदार भिमराव कांबळे, सुरज ओंबासे यांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज व इतर ५० ठिकाणचे फुटेज तपासले. त्यात दिसणारे संशयित आरोपी हे सराईत चोरटे असल्याचे निष्पन्न केले. ताडीगुत्ता परिसरात सापळा रचून पोलिसांनी तिघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी सचिन गवळी याचे नाव सांगितले. सचिन गवळीला अटक करुन त्याच्याकडून ३५ हजार रुपयांची ३० मीटर कॉपर वायर जप्त केली आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनित जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप जगताप, पोलीस अंमलदार  शिंदे, भिमराव कांबळे, शेख, परदेशी, सुरज ओंबासे, गायकवाड, जाधव, शिंदे यांनी केली आहे.

You may have missed