Pune Crime News | पायल झांबरे आत्महत्याप्रकरणी तिच्या सासु सासर्यांना अटक; हॉस्पिटलमधून डिसचार्ज मिळताच स्वारगेट पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे : Pune Crime News | हुंडा, पैसे व सोन्यासाठी सासरी छळ झाल्याने पायल झांबरे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सासु व सासरे यांना बुधवारी सकाळी अटक केली आहे. तिचा पती अक्षय अरविंद झांबरे याला पोलिसांनी या अगोदरच अटक केली आहे.
मंगल अरविंद झांबरे (वय ५८) आणि अरविंद झांबरे (वय ६८, रा. मुकुंदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्याचा मुलगा अक्षय अरविंद झांबरे याला स्वारगेट पोलिसांनी अगोदरच अटक केली आहे. अधिक तपासासाठी न्यायालयाने त्याला ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पायल हिचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. सासरी होणार्या छळाला कंटाळून पायल झांबरे हिने २ नोव्हेबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
या घटनेनंतर अरविंद झांबरे आणि मंगल झांबरे हे पोलिसांपासून वाचण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. हॉस्पिटलमधून आज सकाळी डॉक्टरांनी डिसचार्ज दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून रितसर अटक केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी सांगितले.
