Pune Crime News | पुणे : जागेच्या आमिषाने सव्वा कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपावरून भवानी पेठेतील दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल;धमकी दिल्याचाही आरोप

Pune Crime News | Pune: A case has been filed against a couple in Bhawani Peth for allegedly cheating over one crore rupees with the lure of property; they are also accused of issuing threats

पुणे : Pune Crime News | कोल्हापुरातील जागेच्या लिलावात सहभागी करून जागा मिळवून देण्याचे आमिष दाखवत पुण्यातील एका ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १ कोटी १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मार्केट यार्ड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी भवानी पेठेतील पती-पत्नीविरुद्ध मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिरोज खलील शेख Firoz Khalil Shaikh (वय ४२, रा. भवानी पेठ) आणि फौजिया फिरोज शेख (Fauzia Firoz Shaikh) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड परिसरातील शिवदर्शन कॉम्प्लेक्समधील कार्यालयात हा प्रकार घडला. फिरोज शेख याने तक्रारदारांचा विश्वास संपादन करून कोल्हापूर येथील जागेच्या लिलावात सहभागी करून घेण्याचे आणि संबंधित जागा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.

या आश्वासनावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी १६ मे २०२६ रोजी आरटीजीएसद्वारे १ कोटी १८ लाख रुपये दिले. मात्र, संबंधित लिलावात त्यांचा सहभाग झाला नाही. त्यामुळे त्यांनी दिलेली रक्कम परत मागितली.

तक्रारीनुसार, आरोपींनी संगनमत करून पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. तसेच फिरोज शेख याची पत्नी फौजिया शेख हिने मोबाइलवर संदेश पाठवून धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

You may have missed