Pune Crime News | पुणे हादरले! शिवीगाळ केल्याच्या रागातून गळा दाबून खून; मृतदेहाला 16 किलोचा दगड बांधून विहिरीत फेकले, आरोपीला अटक
पुणे : Pune Crime News | दौंड तालुक्यातील डाळिंब गावातील एका विहिरीत मृतदेहाचे हात पाय तारेने बांधून दगड बांधून विहिरीत फेकून देऊन खुन केल्याचा प्रकार उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन हा खुन करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
भीमाशंकर धोंडिबा खंडागळे (वय ३५, रा. डाळिंब, ता. दौंड) असे खून झालेल्याचे नाव आहे. विजय सुभाष लेचरुड (वय ४०, रा. डाळिंब, ता. दौंड) याला अटक करण्यात आली. याबाबत भीमाशंकर याची आई नंदा (वय ५२) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. भीमाशंकर हा ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घरातून बाहेर पडला. तो रात्री उशीरापर्यंत घरी परतला नाही. त्याची आई नंदा यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार यवत पोलीस ठाण्यात दिली. अपहरण केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, त्यांच्याच गावातील रमेश म्हस्के यांच्या विहिरीत भीमाशंकर खंडागळे याचा मृतदेह मिळाला होता. भीमाशंकर यांचे हातपाय लोखंडी तारेने बांधून व मृतदेहास १५ ते १६ किलोचा मोठा दगड बांधून विहिरीत फेकून खुन केल्याचे निष्पन्न झाले.
या खुनाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलीस करत होते. पोलिसांनी संशयावरुन विजय लेचरुड याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात भीमाशंकर याने त्याला किरकोळ शिवीगाळ केल्याने त्याचा राग मनात धरुन भीमाशंकर याचा गळा दाबून खुन केला व मृतदेह विहिरीत टाकल्याची कबुली दिली. पोलिसांनी विजय लेचरुड याला अटक केली असून पोलीस उपानिरीक्षक अक्षय मोरे तास करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, अक्षय मोरे, दशरथ नंदीवाले, ज्ञानेश्वर राऊत, बाळासाहेब थिकोळे, पोलीस हवालदार संदीप देवकर, सुहास देवकाते, पोलीस अंमलदार मारुती बाराते, प्रतिक जगताप, धीरज जाधव, अमोल भुजबळ, दिनेश लोणकर, सचिन घाडगे, सचिन गुंड, आसिफ शेख, गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, विकास कापरे यांनी केली आहे.
