Pune Pimpri Chinchwad Crime News | गेल्या वर्षी नवरात्रीत झालेल्या भांडणावरुन लोखंडी रॉडने मारुन खूनाचा प्रयत्न

Pune Crime News | Bullet driver and his companions beat up a senior citizen with sticks for telling him not to honk the horn, incident in Maharshi Nagar

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | गेल्या वर्षी नवरात्रीत झालेल्या भांडणाच्या कारणावरुन तरुणाला रस्त्यात अडवून त्याच्या लोखंडी रॉडने वार करुन खूनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Attempt To Murder)

https://www.instagram.com/p/DAsF6pTCSum

याबाबत नितीन नारायण शिंगाडे (वय ४३, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुजल बनपट्टे (वय २०, रा. ओटा स्किम, निगडी), रोहित जाधव (वय २८) आणि अक्षय शिंदे (वय २६, दोघे रा. पिंपळे गुरव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पिंपरीतील नेहरुनगरमधील संतोषी माता चौकात मंगळवारी रात्री ९ वाजता घडला.

https://www.instagram.com/p/DAsM1hDpeUd

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्या गेल्या वर्षी नवरात्रीमध्ये भांडणे झाली होती. फिर्यादी हे भोसरी येथून त्यांचे काम आटपून घरी जात होते. संतोषी माता चौकातील सिग्नल लागल्याने ते थांबले होते. त्यावेळी सुजल बनपट्टे याने मोटार सायकल आडवी लावून फिर्यादीला अडविले. त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात वार केला. फिर्यादी हे पळून जात असताना रोहित जाधव याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या कानामागे मारले. उजव्या पायाच्या घोट्याजवळ मारले. फिर्यादी हे खाली पडले असताना अक्षय शिंदे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक आटवे तपास करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

https://www.instagram.com/p/DAsKJoRpeVn

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed