Pune Pimpri Chinchwad Crime News | घरासाठी तुझ्या बापाकडून पैसे घेऊन येण्याचा तगादा लावल्याने विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | दोन्ही मुली झाल्याने सासरी छळ होत होता. त्यात अगोदर वडिलांनी पैसे दिले असतानाही आता परत घर बांधण्याकरीता तुझ्या बापाकडून पैसे घेऊन ये असा तगादा लावल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. (Married Woman Suicide)
https://www.instagram.com/p/DAnNN90Cpnz
अंजली गोवर्धन जाधव (वय २४, रा. बोडके वाडी, माण ता. मुळशी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचे वडिल देवीदास काशिराम राठोड (वय ४६, रा. मानोरा, जि. वाशिम) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती गोवधृन गोपीचंद जाधव (वय ३०), सासरे गोपीचंद जाधव (वय ५५), सासु कविता जाधव (वय ४७) आणि दिर गोरखनाथ जाधव व नंणद अर्चना राठोड (रा. बोडकेवाडी, माण, ता. मुळशी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
https://www.instagram.com/p/DAnBOwHJcK2
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी अंजली हिचा गोवर्धन जाधव याच्याबरोबर २०१९ मध्ये बंजारा रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. त्यांना दोन्ही मुली झाल्याने सासरी अंजली हिचा छळ होऊ लागला. गोवर्धन जाधव याला दारु पिण्याचे व्यसन आहे. दारु पिऊन तो नातेवाईकांचे ऐकून अंजली हिचा छळ करत होता. गावाकडील घराचे काम काढले असल्याचे सांगून जुलै २०२४ मध्ये जावयाने पैसे मागितले होते. अंजलीच्या वडिलाने त्यांच्याकडील दागिने गहाण ठेवायला देऊन ४५ हजार रुपये व रोख ३० हजार रुपये दिले होते. त्यानंतर आता पुन्हा घरासाठी बापाकडून पैसे घेऊन येत, असा तगादा गोवर्धन याने लावला होता. आपल्या वडिलांची पैसे देण्याची ऐपत नसल्याने अंजली हिने १७ सप्टेबर रोजी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्यावर धार्मिक विधी केल्यानंतर आता तिच्या वडिलांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर झोल (PSI Dnyaneshwar Zol) तपास करीत आहेत.
https://www.instagram.com/p/DAlrdyJCJbe
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’