Ratnagiri Assembly Constituency | विधानसभेत उदय सामंतांना आव्हान देण्यासाठी ठाकरे गटाची रणनीती; भाजपचा नेता आयात करण्याच्या हालचाली

Uday-Samant-on-Uddhav-Thackeray

रत्नागिरी: Ratnagiri Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी रणनीती आखत तयारी सुरु केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) जागावाटपावरून चर्चा सुरु आहे. काही जागांचा तिढा बाकी आहे. मात्र जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे नेते सांगत आहेत.

https://www.instagram.com/p/DAuzA9BpakK

दरम्यान इच्छुक उमेदवार ज्या पक्षातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. राजकीय घडामोडींना वेग आल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवसातच आचारसंहिता घोषित होऊ शकते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत बंड झाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीचा कल काय असणार याबाबत अनेकजण लक्ष ठेवून आहेत.

https://www.instagram.com/p/DAuxai4pJ3p

अनेक मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. मात्र चर्चेत असलेल्या रत्नागिरी-संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघात उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना आव्हान देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाला (Shivsena Thackeray Group) उमेदवार आयात करावा लागणार आहे.

https://www.instagram.com/p/DAuvN86pSkF

सामंत यांच्याविरोधात सक्षम उमेदवार म्हणून भाजपचे माजी आमदार बाळ माने (Bal Mane) यांच्या नावाची चर्चा आहे. तगडा चेहरा म्हणून बाळ माने यांना उद्धव ठाकरे रिंगणार उतरवणार असल्याचं स्थानिक पातळीवर बोललं जात आहे.

https://www.instagram.com/p/DAtIL-wJ0Br

तशा बैठका देखील वरिष्ठ पातळीवर झाल्याची चर्चा रत्नागिरीतील राजकारणात आहे.
पण, अद्याप तरी पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित नाही. बाळ माने हे शिवसेना -भाजप युतीचे आमदार राहिले आहेत. पण, २००४ मध्ये उदय सामंत यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर या मतदारसंघाचे सामंत हेच आमदार म्हणून नेतृत्व करत आहेत.

https://www.instagram.com/p/DAs6mMaJdxT

बाळ माने ठाकरेंच्या शिवसेनेत आल्यास त्यांना ठाकरेंचे शिवसैनिक स्वीकारणार का? त्यांचा प्रचार करणार का? हे जाणून घेण्यासाठी विनायक राऊत यांच्या उपस्थितीत आज (दि.५) पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे. त्यामध्ये उमेदवारीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

https://www.instagram.com/p/DAs31QFpwyR

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Narhari Zirwal Jumps From Mantralaya | नरहरी झिरवळांसह इतर आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या; मंत्रालयात मोठा गोंधळ; जाणून घ्या (Video)

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed