Sambhaji Bhide | ‘बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान’, संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले – ‘आम्ही नवरात्रीचा बट्ट्याबोळ हाणून पाडू’

Sambhaji-Bhide

सांगली: Sambhaji Bhide | नवरात्रोत्सवानिमित्ताने सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदु समाज, असे वक्तव्य भिडे यांनी केले आहे.

https://www.instagram.com/p/DAqO44Bpcvr

गणपती उत्सव, नवरात्र उत्सव हे आता इव्हेंट झाले आहेत. राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण शूद्र आहे. हे थुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत. जगाच्या पाठीवर असंख्य देशांनी आक्रमण केलेला बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे”, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता आक्षेप घेतला जात आहे.

https://www.instagram.com/p/DAqLAGBJA_n

संभाजी भिडे म्हणाले, “आम्ही नवरात्रीचा बट्ट्याबोळ हाणून पाडू. नवरात्र उत्सवात करमणुकीचे कार्यक्रम सुरू आहेत. हे सर्व सण-उत्सवांचा नाश करत चालले आहेत. शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचा बाप व्हायचा मार्ग शिकवलाय. पण गणपती उत्सवाचा चोथा झाला आहे. नवरात्राचा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही.”

https://www.instagram.com/p/DAqEanNpqwf

ते पुढे म्हणाले, “जगाच्या पाठीवर असंख्य देशांनी आक्रमण केलेला बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे. आतापर्यंत आपल्या देशावर ७६ राष्ट्रांनी आक्रमणं केली आहे. ते आता पाठलाग करत असून आपण पाय लाऊन पळत आहोत.

https://www.instagram.com/p/DAqBJgTCNJL

हिंदी- चिनी भाई- भाई म्हणणारा पंतप्रधान आपल्याला दुर्दैवाने मिळाला.
हिंदू – मुस्लिम भाई – भाई, हिंदुंना शत्रू कोण, वैरी कोण, वाईट कोण, चांगलं कोण हे कळत नाही. महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात”, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे.

https://www.instagram.com/p/DAp9n5CimPm

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed