Sharad Pawar NCP Group | भटक्या श्वानांची नसबंदी करुन लसीकरण करावे ! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिटणीस प्रशांत गांधी यांची मागणी
पुणे : Sharad Pawar NCP Group | कुत्रा चावल्यावर वेळेत उपचार केले नाही तर रेबीज होऊ शकतो. तसेच एखाद्याचा मृत्युही होऊ शकतो. त्यामुळे शहरातील सर्व भटक्या श्वानांची नसबंदी करुन लसीकरण करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिटणीस प्रशांत गांधी यांनी केली आहे. जागतिक रेबीज डे निमित्त गांधी यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
https://www.instagram.com/p/DAm7qfbpj_K
कुत्रा चावल्यानंतर त्वरीत उपचार न घेतल्यास रेबीज हा विषाणूजन्य आजार होण्याची शक्यता असते. रेबीजचा विषाणू थेट मज्जासंस्थेवर हल्ला करतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, रेबीजमुळे जगभरात होणार्या एकूण मृत्यु पैकी ३६ टक्के मृत्यु भारतात होता. यापैकी ९५ टक्के घटनांमध्ये कुत्रा चावल्याने रेबीजची लागण होते. पुण्यात गेल्या आठ महिन्यात १४ हजार जणांना श्वानदंश झाला होता.
त्यामुळे महानगरपालिकेने भविष्यात
https://www.instagram.com/p/DAnBOwHJcK2
१) रात्री उशिरा श्वानांना ताब्यात घेऊन त्यांचे ऑपरेशन करावे व रेबीजची लस द्यावी़ कारण रात्री फिरणारे भटके श्वानच जास्त धोकादायक आहेत. आणि रात्रीच्या वेळीच श्वान जास्त आक्रमक असल्याचे आपण पाहतो.
२) महापालिकेच्या बर्याच दवाखान्यांमध्ये या लसींचा पुरवठा अनियमित असतो. त्यामुळे रुग्णांना बर्याच ठिकाणी फिरावे लागते़ आणि अव्वाच्या सव्वा पैसे देऊन खासगी रुग्णालयामध्ये उपचार घ्यावे लागतात. यामुळे महानगर पालिकेने दिवसभर व रात्री उशिरा श्वानदंश झाल्यावर उपचार कोठे मिळतील, याची यादी समाज माध्यमांवर जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
https://www.instagram.com/p/DAnKESzJCQG
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’