Sharad Pawar NCP Vs Shivsena Shinde Group | शरद पवारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिवसेनेचा बडा नेता हातात तुतारी घेणार
मुंबई : Sharad Pawar NCP Vs Shivsena Shinde Group | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टीने सर्वच पक्ष तयारी करताना दिसत आहेत. यंदा विधानसभेला तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीची (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) जागावाटपाची चर्चा सुरु आहे तर तिसरी आघाडी म्हणून संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati), राजू शेट्टी (Raju Shetti), बच्चू कडू (Bachchu Kadu) उमेदवार देण्याबाबत बैठकी घेताना दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/DA5SKXCJOeF
लोकसभेला महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ८ खासदार निवडून आले. त्यामुळे आता विधानसभेला अनेकजण तुतारी (Tutari) या चिन्हावर लढण्यासाठी इच्छुक आहेत. महायुतीच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे.
https://www.instagram.com/p/DA5NGFMpQRd
महायुतीचे एकामागून एक नेते हाती तुतारी घेताना दिसत आहे. त्यातच आता शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा (Vijay Nahata) शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
https://www.instagram.com/p/DA5JlDdJdG1
नाहटा हे यंदाच्या निवडणुकीत महायुतीकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये होते. त्यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. रोज विविध कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रमांमुळे नाहटा यांचा मोठा चाहतावर्ग बेलापूर भागात तयार झाला आहे, मात्र सोमवारी (दि.७) दिल्लीत पार पडलेल्या वरिष्ठांच्या बैठकीत नवी मुंबईतील दोन्ही जागा भाजपला सुटण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
https://www.instagram.com/p/DA5Fq_eCh-Q
ही जागा नाहटा यांना मिळेल अशी आशा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना होती मात्र आता ही जागा भाजपला जाणार असल्याने नवी मुंबईतील शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली असून राजकीय उद्रेक होण्याची चिन्हे दिसत आहेत. नाहटा यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी करून नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता पुढील दोन दिवसात विजय नाहटा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
https://www.instagram.com/p/DA3no9Pi7T8
“महायुतीमध्ये काम करीत असताना २०१९ मध्येही मित्र पक्षाच्या उमेदवाराला जागा दिली.
तेव्हा शांत बसावे लागले होते, मात्र आता शिवसैनिकांच्या भावना आता तीव्र झाल्या आहेत.
सर्वांनी कर्नाळा येथे एकत्र येऊन मला निवडून आणण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे मी लोकांच्या मनातील आमदार आहे.
लोकआग्रहाचा मला मान ठेवावा लागेल”, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. (Sharad Pawar NCP Vs Shivsena Shinde Group)
https://www.instagram.com/p/DA3jLiiCHqI/?img_index=1
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’