Sharad Pawar On Maratha Reservation | आरक्षणाबाबत शरद पवारांचे मोठे विधान; म्हणाले – ‘मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, आरक्षण विधेयकामध्ये दुरुस्ती करावी, आपण सरकारच्या बाजूने उभे राहू’

sharad-pawar

सांगली : Sharad Pawar On Maratha Reservation | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनाही दौरे करतेवेळी आरक्षणाचा प्रश्न सतावत आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही आरक्षणाच्या मुद्यावरून घेरले जात आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. दुसरीकडे ओबीसी समाजही (OBC Samaj) रस्त्यावर येऊन आंदोलन उपोषण करीत आहेत. या सर्वांमध्ये सरकारची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

https://www.instagram.com/p/DAqrWr_i1aY

याबाबत आता शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. “मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. आरक्षण विधेयकामध्ये दुरुस्ती करावी. आपण सरकारच्या बाजूने उभे राहू. ५० % आरक्षणाच्या वर जाता येत नाही, पण त्याच्यावर जायचं असेल तर संसदेत बदल केला पाहिजे. दुरुस्ती करायला काय हरकत नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.

https://www.instagram.com/p/DAqXn3MCH9p

माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, आरक्षण विधायकमध्ये दुरुस्ती करावी आपण सरकारच्या बाजूने राहू. ५० टक्के आरक्षणावर जाता येत नाही, पण त्याच्यावर जायचं असेल तर संसदेत बदल केला पाहिजे, दुरुस्ती करायला काय हरकत नाही, ५० टक्केच ७५ टक्क्यांवर जायला पाहिजे.

https://www.instagram.com/p/DApufhdiIIq

तमिळनाडूमध्ये ७८% वर आरक्षण जातं तर महाराष्ट्रात ७५% वर का होऊ शकत नाही. ७५ टक्के झाल्यास सगळ्यांनाच आरक्षण मिळेल ज्यांना मिळालं नाही त्यांनाही मिळेल कोणताही वाद उरणार नाही,” असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.

https://www.instagram.com/p/DAp3R-biifV

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed