Shobhatai R Dhariwal | ‘एक झाड आईचे’ वृक्षारोपण कार्यक्रम दरवर्षी साजरा करणार – शोभाताई आर धारीवाल

Shobhatai R Dhariwal

पुणे : Shobhatai R Dhariwal | आर एम डी फाऊंडेशन (RMD Foundation) द्वारा दरवर्षी हजारो झाडं संपूर्ण भारतभर लावली जातात. यावर्षीही रांजणगाव, उपलाट तलासरी, वाघोली, दमण ईत्यादी ठिकाणी मोठ्याप्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करतांना शाळा, महाविद्यालयं, रुग्णालय, सार्वजनिक उद्याने, डोंगर भाग तसेच गायरान ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येते, त्यांना वर्षभर पाणी मिळेल व झाडं जगतील याची काळजी घेतल्या जाते. यापुढे शाळा-महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ‘एक झाड आईचे’ अशी योजना कार्यान्वीत करीत असल्याची माहिती आर एम डी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल यांनी महात्मा गांधी विद्यालय उरळी कांचन येथे दिली.

प्रत्येक विद्यार्थ्याने झाडं लावावी, ती झाडं दत्तक घ्यावी व जगवावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने 2700 स्वदेशी झाडांचे वितरण व वृक्षारोपण करण्यात आले. वितरीत केलेल्या झाडांची निगा, वाढ व जोपासना केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व योग्य बक्षीस देऊन गौरवण्यात येईल असेही त्या म्हणाल्या. यावेळी शाळेचे विश्वस्त देवीदास भन्साळी यांचेही सहकार्य मिळाले.

वृक्षवितरण व वृक्षारोपण वेळी प्राचार्य भोसले, शिक्षक व कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Narhari Zirwal Jumps From Mantralaya | नरहरी झिरवळांसह इतर आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या; मंत्रालयात मोठा गोंधळ; जाणून घ्या (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed