Smt. Lakshmibai Dagdusheth Halwai Datta Mandir Trust | सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टकडून 5 हजार राख्या
अध्यक्ष पुनीत बालन यांनी मेजर जनरल मनोज जोशी यांना पत्र पाठवून राख्या स्वीकारण्याची केली विनंती
पुणे : Smt. Lakshmibai Dagdusheth Halwai Datta Mandir Trust | सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुण्यातील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने जवानांसाठी ५ राख्या पाठविण्यात येणार आहेत. याबाबत ट्रस्टचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील १९ इन्फंट्री डिव्हिजनचे मेजर जनरल मनोज जोशी यांना पत्र पाठविले असून त्यात या राख्या विनंती केली आहे. (Dagdusheth Halwai Datta Mandir Trust)
बालन यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून, शहरातील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर हे पुणे शहरासाठी आध्यात्मिक अभिमानाचे प्रतीक ठरलेले आहे. मंदिराच्या ट्रस्टच्या संस्थापिका श्रीमती लक्ष्मीबाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माध्यमातून धार्मिक, अध्यात्मिक आणि सामाजिक असे अनेक उपक्रम राबविले जातात.
या उपक्रमांतर्गत रक्षाबंधनानिमित्त सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत जवानांना ट्रस्टच्या माध्यमातून ५ हजार राख्या पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या राख्या ‘सेवा सदन दिलासा कार्यशाळा’ या संस्थेत तयार करण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे. जवानांच्या मनगटावर पुण्यातून पाठविलेली राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना या उपक्रमामागे आहे. तरी जवानांना या राख्या स्वीकारून रक्षाबंधनाच्या निमित्ताने पुणेकरांच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात, अशी विनंतीही बालन यांनी केली आहे. या उपक्रमासाठी ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त राजू बलकवडे, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे, वर्षा थोरवे, खजिनदार ॲड.सुरज थोरात, उत्सव प्रमुख नितीन पंडित, उप-उत्सव प्रमुख मनीषा खेडेकर, विश्वस्त डॉ. पराग काळकर आणि महेंद्रशेठ गाडवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टवर अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे. हे मी माझे भाग्य समजतो. या ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या कुटुंबियांपासून हजारो मैल दूर आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी लढणाऱ्या जवान बांधवांसाठी पाच हजार राख्या प्पाठविण्यात येणार आहेत. या राख्या बौद्धिक अपंगांसाठी कार्यरत असणाऱ्या “सेवा सदन दिलासा कार्यशाळा” या संस्थेतून तयार झालेल्या आहेत.
– पुनीत बालन (अध्यक्ष)
