Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Supriya Sule

पुणे : Supriya Sule On Mahayuti Govt | आगामी विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Election 2024) लगबग सुरु झाली आहे. सर्वच पक्षांनी रणनीती आखत तयारी सुरु केली आहे. नेत्यांचे दौरे सुरु आहेत. दरम्यान इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.

https://www.instagram.com/p/DAbInbRJ6jg

अशातच आता मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) सिनेट निवडणुकीच्या निकालाची सर्वत्र चर्चा आहे. पक्षात बंड होऊनही शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) युवासेनेने आपले वर्चस्व कायम ठेवत १० पैकी १० जागा जिंकल्या आहेत. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला एकही जागा मिळवता आली नाही.

https://www.instagram.com/p/DAbNTlOJNGm

यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी युवासेनेचे कौतुक करत राज्यातील सत्ताधारी महायुतीवर हल्लाबोल केला आहे. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही सत्ताधाऱ्यांनी अशाच पद्धतीने अडवून धरल्या आहेत. पण जेंव्हा या निवडणुका होतील तेंव्हा जनता चोख उत्तर देईल”, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

https://www.instagram.com/p/DAbBpCtJpaF

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळवला. ही निवडणूक सत्ताधारी भाजपाकडून सातत्याने पुढे ढकलण्यात येत होती. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही सत्ताधाऱ्यांनी अशाच पद्धतीने अडवून धरलेल्या आहेत. जेव्हा या निवडणुका होतील तेंव्हा जनता त्यांना चोख उत्तर देईल. युवासेना आणि सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. (Supriya Sule On Mahayuti Govt)

https://www.instagram.com/p/DAaawvhi31f

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Viman Nagar Pune Crime News | प्रवासादरम्यान माझ्याजवळ झोप असे म्हणत बसचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्‍यास पोलिसांनी केली अटक

Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’

You may have missed