Swargate Pune Crime News | शर्ट इन न केल्याने शिक्षकांची 11 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण; नाकातून कानातून आले रक्त, पोलिसांनी नोंदविला गुन्हा

पुणे : Swargate Pune Crime News | कॉम्प्युटर क्लास चालू असताना शर्ट इन का केला नाही, याकारणावरुन शिक्षकाने एका ११ वर्षाच्या मुलाला इतकी मारहाण केली की त्याच्या नाकातून व कानातून रक्तस्त्राव झाला. स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police Station) या शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.
https://www.instagram.com/p/DAuvN86pSkF
संदेश भोसले (वय २६) असे या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत मुलाच्या वडिलांनी (वय ४४) स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार एका शाळेतील ६ वीच्या क्लासरुममध्ये २७ सप्टेंबर रोजी घडला आहे.
https://www.instagram.com/p/DAuzA9BpakK
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा ११ वर्षांचा मुलगा ६ वीमध्ये शिक्षण घेत आहे. क्लास रुममध्ये कॉम्प्युटरचा क्लास चालू असताना कॉम्प्युटरचे शिक्षक संदेश भोसले यांनी इनशर्ट का केले नाही, या कारणावरुन फिर्यादीचे मुलास हाताने बेदम व अमानुष मारहाण केली. त्यामुळे मुलाच्या नाकातून व कानातून रक्तस्त्राव झाला.
शाळेतून घरी आल्यानंतर मुलाने त्याच्या आईला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
त्यानंतर त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक तानावडे तपास करीत आहे.
https://www.instagram.com/p/DAuxai4pJ3p
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’