Wanwadi Pune Crime News | पुण्यात धावत्या स्कूल बसमध्ये चालकाकडून दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार

School Bus

पुणे : Wanwadi Pune Crime News | शाळेत ने आण करण्यासाठी लावलेल्या स्कुल बसचालकानेच ६ वर्षांच्या दोन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) स्कुल बसचालकाला अटक केली आहे.

https://www.instagram.com/p/DApk8iAp7e3

संजय जेटिंग रेड्डी (वय ४५, रा. वैदवाडी, हडपसर) असे या नराधम स्कुल बसचालकाचे नाव आहे. याबाबत एका मुलीच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३० सप्टेबर रोजी स्कुल बसमध्ये घडला होता.

https://www.instagram.com/p/DApis5HiKOY

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सहा वर्षाची मुलगी आपल्या खासगी जागेत खाज येत असल्याचे सांगत होती. तेथे आईला डाग व इन्फेक्शन झाल्याचे दिसून आले. तेव्हा तिने आपल्या मुलीला प्रेमाने विचारल्यावर तिने स्कुल बसचालक संजय अंकल बसमधून घरी येत असताना मला जवळ बसवून माझ्या शीच्या व सुच्या जागी हात लावून दाबतात व त्यावरुन हा फिरवतात. तीन चार दिवस झाले मला व माझ्या मैत्रिणीलाही असेच करतात, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी दुसर्‍या दिवशी आपल्या मुलीला स्कुल बसमधून पाठविले नाही. मुलीच्या वडिलांनी तिला शाळेत सोडले. तिच्या मैत्रिणीच्या वडिलांना हा सर्व प्रकार सांगितला. तिच्या आईने देखील खात्री केली तेव्हा तिच्याबाबतीतही असाच प्रकार झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. वानवडी पोलिसांनी या नराधम स्कुल बसचालकाला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक देवधर तपास करीत आहेत. (Wanwadi Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DApnifUJzzl

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’