Rohit Sharma On Varsha Bungalow | जगज्जेत्या खेळाडूंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते सत्कार! रोहित, सूर्या, दुबे, यशस्वी ‘वर्षा’वर
मुंबई : Rohit Sharma On Varsha Bungalow | टी२० विश्वचषक टीम इंडियाने १३ वर्षांनी जिंकला. भारतीय संघाने दिल्लीत आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. काल मुंबईत सर्व खेळाडू विजय मिरवणुकीत सहभागी झाले होते. या सोहळ्यानंतर आज कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadhav), शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) या चौघांनी मुख्यमंत्र्यांची (CM Eknath Shinde) वर्षा निवासस्थानी भेट घेतली. येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
देशांतर्गत स्पर्धांमध्ये मुंबईच्या संघाकडून खेळणारे खेळाडू कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत वर्ल्ड चॅम्पियन्सचा सत्कार करण्यात आला. (Rohit Sharma On Varsha Bungalow)
भारतीय संघात समावेश असलेले हे चार खेळाडू देशांतर्गत स्पर्धांमध्ये मुंबईच्या संघाकडून खेळतात.
कर्णधार रोहित शर्मा, फलंदाज सूर्यकुमार यादव, अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे
यांनी वर्ल्डकपमध्ये भारताच्या विजयाला मोठा हातभार लावला आहे. यशस्वी जैस्वाल याचाही संघात समावेश होता.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : टिंडर डेटिंग अॅपच्या ओळखीतून महिलेवर बलात्कार, आरोपी गजाआड
Fix Deposit Interest Rates | HDFC आणि Axis बँकेने ग्राहकांना दिली भेट, या लोकांना होईल फायदा