Pune Crime News : सराईत गुंडाच्या खुन प्रकरणात तिसरा आरोपी जेरबंद ! दिवाळीच्या पूर्व संध्येला कोथरुडमधील सुतारदरा येथील घटनेत तिघांना अटक  

Pune Crime News: Third accused arrested in the murder case of a seasoned gangster! On the eve of Diwali, an incident in Sutaradara, Kothrud led to the arrest of three people.

पुणे : Pune Crime News । पूर्ववैमनस्यातून दुचाकीवरुन जाणार्‍या सराईत गुन्हेगाराला अडवुन त्याच्यावर कोयता, तलवारीने वार करुन त्याचा खुन करणार्‍या तिघा जणांना कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे.

लाल्या ऊर्फ प्रकाश शांताराम येवले (वय २८, रा. सुतारदरा, कोथरुड) असे खुन झालेल्याचे नाव आहे. कोथरुड पोलिसांनी अक्षय किसन साठे Akshay Kisan Sathe  (वय ३०, रा. भूगाव, मुळ रा. सुतारदरा, कोथरुड) याला रविवारी अटक केली आहे. पोलिसांनी यापूर्वी विकी प्रमोद मोरे  Vicky Pramod More (वय २६, रा. सुतारदरा) आणि अनिकेत ऊर्फ दत्तात्रय ऊर्फ अंड्या संजय मालपोटे  Aniket aka Dattatray aka Andya Sanjay Malpote (वय २१, रा. दत्तवाडी, सुतारदरा) यांना अटक केली होती. रविवारच्या सुट्टीच्या कोर्टात त्यांना हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी ५ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

याबाबत अभिषेक विभिषण घारे (वय १९, रा. श्रावणधरा सोसायटी, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सुतारदरा येथील शिवसाम्राज्य सार्वजनिक गणेश मंडळाजवळ शनिवारी ७ नोव्हेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजता घडली होती.

लाल्या ऊर्फ प्रकाश येवले हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्याविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खानापूर परिसरातील सी आर बॉईज या टोळीचा तो सदस्य होता.

आरोपी व प्रकाश येवले हे एकाच वस्तीत राहणारे आहेत. प्रकाश येवले हा या आरोपींना जाता येता शिवीगाळ करुन बघून घेतो, असे म्हणून दमदाटी करत़ त्यांच्याशी भांडणे करत असत. फिर्यादी अभिषेक घारे, प्रकाश येवले व त्यांचा मित्र हे चहा पिण्यासाठी दुचाकीवरुन जात होते़  शिवसाम्राज्य मंडळाजवळ प्रकाश येवले याने आरोपींना आवाज देऊन शिवीगाळ केली. तेव्हा आरोपींनी त्यांची मोटारसायकल ओढली. त्यामुळे ते खाली पडले. त्यांच्याजवळ शस्त्रे होती. ते पाहून हे आता आपल्याला मारतील, असे वाटल्याने विकी मोरे याने त्याच्याकडील कोयत्याने घारे याच्या तळहातावर वार करुन त्याला जखमी केले. त्यानंतर त्याने प्रकाश येवले याच्या तोंडावर व डोक्यात वार केले.

त्यावेळी घारे याने त्याच्या हातातील लोखंडी हत्यार आरोपीकडे फेकून मारले. अक्षय साठे याने तेच हत्यार घेऊन प्रकाश येवले याच्यावर वार केले. अनिकेत मालपोटे याने सिमेंटचा ब्लॉक प्रकाश येवले याच्या छातीवर मारुन त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर ते पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक सुनिल कारोटे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. रुग्णालयात नेले असता प्रकाश येवले याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी शोध घेऊन शनिवारी रात्रीच विकी मोरे आणि अनिकेत मालपोटे यांना अटक केली होती. त्यानंतर रविवारी रात्री अक्षय साठे याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सुनिल कारोटे तपास करीत आहेत.

You may have missed