Pune Crime News | पुणे: जबदस्तीने तरुणीच्या घरात घुसून अश्लील वर्तन, तरुणावर गुन्हा दाखल

Pune Crime News | Taking advantage of the absence of a mother at home, a young man sexually assaulted a 17-year-old girl by promising her marriage

पुणे : Hadapsar Pune Crime News | तरुणीने मैत्री करण्यास नकार दिल्यानंतर तिचा वारंवार पाठलाग केला. तरुणी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या घरात जबदस्तीने घसून तिच्यासोबत अश्लील कृत्य करुन तिला बघुन घेण्याची धमकी दिली. हा प्रकार डिसेंबर 2022 ते 12 जुलै 2024 या कालावधीत वेळोवेळी घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पिडीत तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार सुदर्शन आसमानराव गायके Sudarshan Aasmanrao Gayke (वय-25 रा. ऑरबीट शाळेजवळ, आनंदनगर, मुंढवा) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 74, 75, 78, 351, 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीगी हडपसर येथील मॉलमध्ये कामाला होती.
तिने आरोपीला त्याच्यासोबत मैत्री करण्यास नकार दिला होता.
तरी देखील त्याने मुलीचा हात पकडून तिला मिठी मारुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
तसेच पिडीत मुलीचा पाठलाग करुन काम करत असलेल्या ठिकाणी येऊन त्रास दिला.
त्याच्या त्रासाला कंटाळून तिने मॉलमधील काम सोडून दुसरीकडे काम करु लागली.
तरी देखील सुदर्शन याने मुलीचा पाठलाग करुन ती काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन त्रास दिला.
तसेच तिच्या घरात जबरदस्तीने येऊन तिला अश्लील शिवीगाळ करुन बघुन घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chinchwad Assembly Constituency | चिंचवड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार; शत्रुघ्न काटेंचे शक्तिप्रदर्शन

Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार

You may have missed