Newly Married Couple Suicide | अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न, दोघेही पुण्यात नोकरीला; गावाकडे परतले अन् संपवलं जीवन
संगमनेर : Newly Married Couple Suicide | अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याने गळफास घेऊन (Hanging Case) आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. वैभव आमले Vaibhav Amle (वय-२२) आणि स्नेहा आमले Sneha Amle (वय-२०) या दोघांचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. वैभव आमले हे पुण्यात नोकरीस होते. दोन दिवसांपूर्वी नुकतंच दोघंही आपल्या गावी साकूरला आले. (Sangamner Crime News)
या नवविवाहित दाम्पत्याने रविवारी संध्याकाळी साकुर येथील मांगमळीत गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी या नवदाम्पत्याने एका झाडाला दोर बांधून एकत्रच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. (Nagar Newly Married Couple Suicide)
घटनेची माहिती घारगाव पोलिसांना (Ghargaon Police Station)कळताच तातडीने घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर नवदाम्पत्यांचा मृतदेह संगमनेर येथील रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या नवदाम्पत्याने आत्महत्या का केली याचा तपास केला जात आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”
Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी