Pune News | ऐतिहासिक भिडे वाड्यात ‘एक दिवा ज्ञानाचा’ उपक्रम; संविधानिक मूल्यांचा जागर

Pune News | 'One Lamp of Knowledge' initiative at historic Bhide Wada; awakening of constitutional values

पुणे : Pune News | दीपावली पाडव्याच्या निमित्ताने भारतीय संविधान सन्मान परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ऐतिहासिक भिडे वाडा येथे ‘एक दिवा ज्ञानाचा’ हा अभिनव उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेल्या या ऐतिहासिक स्थळी ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याचा आणि भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुता या मूल्यांचा प्रसार करण्याचा संकल्प करण्यात आला.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमांसमोर दीप प्रज्वलित करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची प्रतिज्ञा केली.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन दीपक ओव्हाळ, प्रभाकर सरोदे, प्रसाद शेलार आणि संजय जाधव यांनी केले.

कार्यक्रमाला हरीभाऊ वडमारे, नागेश भोसले, दीपक गायकवाड, अरविंद कांबळे, प्रदीप कांबळे, सचिन अहिरे, सिद्धांत सुर्वे, शाम गोरे, संजय जाधव, नितीन गायकवाड, मुकुंद गंगावणे, अनिल डिंगिया, अनिल धेंडे आणि अविराज मराठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

दिवाळीच्या प्रकाशोत्सवातून ज्ञान, शिक्षण आणि संविधानिक मूल्यांचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी विशेष ठरला.

You may have missed