Dnyanda Foundation Pune | ज्ञानदा फाऊंडेशनच्या माध्यमातून शालेय विद्यार्थाना स्कूल बॅगचे वाटप

Dnyanda Foundation Pune

पुणे : Dnyanda Foundation Pune | देशाच्या 7८ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित साधून आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि संस्थेच्या समग्र साक्षर अभियान या उपक्रमाअंतर्गत ससुन वसाहत पुणे स्टेशन येथील बालविकास शिक्षण संस्था प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले आहे. मा.श्री. विवेक नायडू (मानसेवी अधिकारी नागरी संरक्षण दल) यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण करून विद्यार्थ्यानी राष्ट्रगीत, राज्यगीत व क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ भाषणे व्यक्त केली.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंजू जाधव मॅडम यांनी मनोगत व स्वागत केले. हडपसर परिसरातील अमॅनोरा लेबर कॅम्प येथील मजूरांच्या मुलानां शिक्षणाच्या प्रवाहात घेऊन येण्यासाठी बालविकास शिक्षण संस्था प्राथमिक शाळा नेहमी अग्रेसर असते. या शाळेत विद्यार्थ्याना नियमित शिक्षण दिले जाते. तसेच शिक्षणाबरोबर या मुलानां नियमित मध्यान्ह भोजन देखिल दिले जाते. कोणतेही शुल्क न घेता या विद्यार्थ्याना मोफत शिक्षण दिले जाते. आज संस्थेच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्याना स्कूल बॅगचे वाटप होत असताना आम्हाला आनंद होत आहे असे मुख्याध्यापिका श्रीमती जाधव मॅडम म्हणाले.

तसेच शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये या करिता ज्ञानदा फाऊंडेशन या संस्थेने समग्र साक्षर अभियान हा उपक्रम सन-2021 साली सुरू केला असून या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद, विना अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, अक्षर ओळख होऊन शैक्षणिक पाया भक्कम व्हावा म्हणून विविध शाळांमध्ये शैक्षणिक पुस्तक, वही, स्कूल बॅग इत्यादीचे मोफत वितरण केले जात असल्यांचे लखन गायकवाड यांनी माहिती दिली.

त्याचप्रमाणे लहान मुलाना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्याना स्कूल बॅगचे आणि खाऊ वाटप करण्यात आले
या कार्यक्रमास निकम (संचालक) हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे श्रीमती सुवर्णा पाटील यांनी आभार व्यक्त केले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sinhagad Road Flyover | अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले – ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले असे आमचे सरकार’

Hadapsar Pune News | हडपसर: बहुचर्चित भारतातील सर्वात पहिल्या प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्र्याचा हस्ते होणार उद्घाटन !

Pune ACB Trap Case | महिला सहायक सरकारी वकिल एसीबीच्या जाळ्यात; जप्त कार परत मिळवून देण्यासाठी मागितली लाच

Sri Sri Ravi Shankar | वैचारिक अभिव्यक्ती आणि विविधता हेच भारताला भारत बनवते ! – गुरुदेव श्री श्री रविशंकर

You may have missed