Pune Crime Branch News | अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या गुन्हेगाराकडून ७ लाखांचा मॅफेड्रॉन जप्त
पुणे : Pune Crime Branch News | अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या गुन्हेगाराला अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Cell Pune) पकडून त्याच्याकडून ७ लाख रुपयांचा मॅफेड्रॉन (एम डी) जप्त केला आहे़
सागर जयसिंग चव्हाण Sagar Jaisingh Chavan (वय ३४, रा. गायत्री भवनशेजारी, रविवार पेठ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड (PI Sudarshan Gaikwad) तसेच पोलीस अंमलदार हे फरासखाना पोलीस ठाण्याच्या परिसरात बुधवारी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार साहिल शेख यांना माहिती मिळाली. त्यानुसार रविवार पेठेतील मिरा दातार दर्गा रोडवर थांबलेल्या सागर चव्हाण याला पोलिसांनी संशयावरुन ताब्यात घेतले. त्याकडे ६ लाख ४० हजार रुपयांचे ३२ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम डी) व इतर ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. (Pune Crime Branch News)
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade), पोलीस उपायुक्त निखील पिंगळे (DCP Nikhil Pingle), सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी (PSI Ramkrishna Dalvi), पोलीस अंमलदार साहिल शेख, अझीम शेख, चेतन गायकवाड, रवींद्र रोकडे, संदिप जाधव, नितीन जगदाळे, योगेश मांढरे, निलम पाटील यांनी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध
Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग
Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये –
पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन