BMC Recruitment | मुंबई महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! लिपिक पदाच्या 1 हजार 846 जागा सरळ सेवेने भरण्यात येणार

मुंबई: BMC Recruitment | हातात पदवी आली की अनेकांचाच नोकरीसाठीचा शोध सुरू होते. काही मंडळींचा हा शोध हाती पदवी येण्याआधीच सुरू झालेला असतो. हल्ली नोकरीच्या शोधातही अनेक प्राधान्यक्रम पाहायला मिळतात. अगदी नोकरीच्या ठिकाणापासून नोकरीच्या ठिकाणी दिला जाणारा पगार, सुट्ट्या इथपासून कामाचं स्वरुप असा हा एकंदर प्राधान्यक्रम असतो. अशाच चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं एक सुवर्णसंधी देण्यात येत आहे. (BMC Recruitment)
मुंबई महापालिकेत कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदाच्या १ हजार ८४६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, मंगळवार, २० ऑगस्टपासून ९ सप्टेंबरपर्यंत इच्छुकांना त्यासाठी अर्ज करता येतील. पालिकेच्या वेबसाईटवर या भरतीबाबत सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे. दरम्यान, पाणी पुरवठा विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे त्या विभागावरही कामाचा ताण आहे.
आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील रुपये २५,५०० – ८१,१०० ( पे मॅट्रिक्स-एम १५ ) अधिक भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील ही पदे भरण्यात येणार आहेत.
आरक्षित प्रवर्गानुसार जागा खालीलप्रमाणे,
अनुसूचित जाती (१४२), अनुसूचित जमाती (१५०), विमुक्त जाती-अ (४९), भटक्या जमाती-ब (५४), भटक्या जमाती-क (३९), भटक्या जमाती-ड (३८), विशेष मागास प्रवर्ग (४६), इतर मागासवर्ग (४५२), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (१८५), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (१८५), खुला प्रवर्ग (५०६) याप्रमाणे रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. तसेच या पदांचे समांतर आरक्षणानुसार वर्गीकरण करण्यात आले असून त्याची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिली आहे.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद