Money Laundering Case | ‘मनी लॉन्ड्रींग’ प्रकरणी मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानांवर ईडीचे छापे

Mangaldas-Bandal

पुणे: Money Laundering Case | जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांच्या महंमदवाडी (पुणे), शिक्रापूर बुरुंजवाडी येथील निवासस्थानांवर ईडीने छापेमारी (ED Raids) केली आहे. मंगळवारी (दि.२०) सकाळी ७ वाजता ‘ईडी’ च्या अधिकाऱ्यांनी एकाचवेळी या निवासस्थानांवर छापे मारले. यापूर्वी मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानावर आयकर विभागाने छापा टाकला होता. यावेळी प्रथमच ‘ईडी’ने कारवाई केली आहे. (ED Raids Mangaldas Bandal)

कारवाईच्या वेळी मंगलदास बांदल हे आपल्या मोहम्मद वाडी, पुणे येथील निवासस्थानी होते. तर शिक्रापूर येथील निवासस्थानी त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल (Rekha Bandal) तसेच बांदल यांचे भाऊ आहेत. ‘मनी लॉन्ड्रींग’ प्रकरणी ईडीने ही कारवाई केली असून कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. बांदल यांच्याशी संबंधित बँकेचे लॉकरही अधिकाऱ्यांनी तपासून पाहिले आहेत. (Money Laundering Case)

बांदल हे शिवाजीराव भोसले सहकारी बँक प्रकरणातील आरोपी आहेत. बराच काळ ते तुरुंगात होते, सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांनी लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी घेतली होती, परंतु ती उमेदवारी नंतर वंचितनेच रद्द केली होती. शिरूर – हवेली विधानसभा लढविण्यासाठी सध्या ते इच्छुक आहेत.

बांदल हे ‘ईडी’ च्या चौकशीसाठी चार वेळा उपस्थित राहिले असून ते तपास कामी वे
ळोवेळी उपस्थित राहिले असल्याची माहिती त्यांचे वकील ऍड.आदित्य सासवडे यांनी दिली आहे.

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sunil Tatkare On Mahendra Thorve | आमदार महेंद्र थोरवेंच्या टीकेला तटकरे, अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – “महेंद्र थोरवेला मी मोजत नाही”

Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | “राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष” शिंदे गटाच्या आमदाराची टीका; महायुतीत कलगीतुरा रंगला

Amol Balwadkar Foundation | कोथरूडकर वहिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा! मंगळागौर, पैठणीच्या खेळाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या उपक्रमाने भगिनी गहिवरल्या

Amol Balwadkar Foundation | धागा मायेचा, वीण विश्वासाची…! अमोल बालवडकर यांना हजारो महिलांनी बांधली राखी; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन

Congress Mohan Joshi | शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू – माजी आमदार मोहन जोशी

You may have missed