Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभेला अजित पवार महायुतीसोबत असणार?; महायुतीतल्या तणावावरून फडणवीसांची अमित शहांशी भेट, दीड तास खलबतं

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची सोमवारी (दि.१९) भेट घेत चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. जागावाटपाच्या मुद्यावरून महायुतीत (Mahayuti) सध्या धुसफूस सुरु आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या समवेत भेट घेतली आहे. (Devendra Fadnavis Delhi Tour)
दरम्यान या भेटीत दीड तास चर्चा झाल्याची माहिती आहे. महायुतीत नवाब मलिक (Nawab Malik) यांचा समावेश तसेच मलिकांच्या मुलीला अजित पवारांनी प्रवक्ते पदाची दिलेली जबाबदारी यामुळे महायुतीत वादंग निर्माण होऊ शकतात. अद्याप तरी भाजपाकडून यावर प्रतिक्रिया आलेली नाही. (Maharashtra Assembly Election 2024)
दरम्यान, नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून शिवसेना (Shivsena UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. गेल्या वर्षी देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक महायुती सोबत नकोत, असे पत्र अजित पवार (Ajit Pawar) यांना लिहिले होते, त्यानंतर आम्ही राष्ट्रभक्त असून नवाब मलिकांचे सोबत असणे योग्य नाही, असे त्यांनी अजितदादांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते, त्यामुळे फडणवीसांनी मलिक यांच्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत, असे सांगावे असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे महायुतीसोबत असणार की नाही, यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे महायुतीत असल्याचे सांगितलं जात असलं तरी आगामी निवडणुकीत काही वेगळ्या घडामोडी घडतात का हेही पाहणे औत्सुक्याचे आहे.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद