Former MLA Anil Bhosale | बँक गैरव्यवहार प्रकरणी माजी आमदार अनिल भोसले यांना जामीन मंजूर; बांदल यांच्या अटकेने अडचणी वाढणार?

Anil Bhosale

पुणे : Former MLA Anil Bhosale | शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत (Shivajirao Bhosale Sahakari Bank) सुमारे ४३६ कोटी ४४ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांच्या (Pune Police) आर्थिक गुन्हे शाखेने (Pune EoW) तीन वर्षांपूर्वी अनिल भोसले यांच्यावर कारवाई केली होती. बँकेतील व्यवस्थापक, भोसले, मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांच्यासह सात जणांविरुद्ध पोलिसांनी ६ सप्टेंबर २०२१ रोजी ८ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले.

कट करून कर्जदार आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. दरम्यान आता शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गेले तीन वर्षे कारागृहात असलेले माजी आमदार अनिल भोसले यांना उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे.

या गुन्ह्यामध्ये भोसले, बांदल, तसेच अन्य आरोपी कारागृहात होते. बांदल यांची काही महिन्यांपूर्वी जामिनावर मुक्तता झाली. भोसले यांचा जामीन सत्र न्यायालयाने चार वेळा फेटाळला होता. त्याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने काही अटी शर्ती देऊन हा जामीन मंजूर केला आहे.

मात्र, या गुन्ह्यात पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल
यांना ईडी ने मंगळवारी (दि.२०) अटक केल्याने भोसले यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

ACB Trap On Female Education Officer | 2 लाखांची लाच घेताना महिला शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात;
शासनाने दिलेले थकीत वेतन अधीक्षकांनी ठेवले अडवून

Market Yard Pune Crime News | 15 वर्षाच्या मुलीशी शारिरीक संबंध; त्याचा व्हिडिओ काढून 20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Eknath Shinde On Badlapur School Girl Incident | बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट;
म्हणाले, बाहेरून लोकं आणली, आंदोलन राजकीय प्रेरित…”

Maharashtra Assembly Election 2024 | भाजपचे दोन नेते शरद पवारांच्या संपर्कात, राजकीय समीकरणे बदलणार?