Dahi Handi Pune | पुण्यातील सर्वात भव्य धर्मवीर आनंद दिघे दहिहंडीचे आयोजन

Dahi Handi Pune

पुणे : Dahi Handi Pune | हडपसरच्या श्रीराम चौकात, पुण्याचे खास आकर्षण असलेल्या, ‘धर्मवीर आनंद दिघे दहिहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.‌ हडपसरमधील शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्यामार्फत आयोजित करण्यात येणारा हा दहिहंडी महोत्सव, कोणत्याही सेलीब्रेटीच्या उपस्थितीशिवाय सर्वात जास्त गर्दी होणारा पुण्यातील दहिहंडी महोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे.

या दहिहंडी महोत्सवात विजेत्या संघाला ७ लक्ष १७,हजार १७१ रूपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. दरवर्षी थरांचे विक्रम करणारा दहिहंडी महोत्सव म्हणून ही धर्मवीर आनंद दिघे दहिहंडी महोत्सव प्रसिद्ध आहे. सुसज्य ढोलपथक, उत्कृष्ट डॉल्बी साउंड यंत्रणा, राज्यभरातून येणारे गोविंदा पथक यासाठी हा धर्मवीर आनंद दिघे दहिहंडी महोत्सव प्रसिद्ध आहे.

या दहिहंडीला केंद्रीय सहकार आणि नागरी वाहतूक या मंत्रालयाचे राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकातदादा पाटील, विधानपरीषद उपसभापती शिवसेना नेत्या डॉ.निलमताई गोऱ्हे ,विधानपरीषद आमदार योगेश टिळेकर,आदिंसह महायुतीचे अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.नागरिकांनी या दहिहंडीला उपस्थित राहुन, गोपालांचा उत्साह वाढवावा,असे आवाहन आयोजक शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी केले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | मुलीच्या औषधाला नाही, दारुला पैसे आहेत, म्हटल्याने पत्नीचे डोके भिंतीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न

Maharashtra Assembly Election 2024 | मुंबईतील 7 जागा लढवण्याची शरद पवार गटाची तयारी; इच्छुक उमेदवारांची नावेही आली समोर; जाणून घ्या

BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – “मित्रपक्षांनाही जो चेहरा नकोसा झालाय, त्याला …”

You may have missed