Pune Police Raid On Gambling Den | किशोर सातपुतेच्या गुरुवार पेठेतील जुगार अड्ड्यावर छापा; खंडणी विरोधी पथकाची कारवाई, 10 जणांना अटक

पुणे : Pune Police Raid On Gambling Den | गुरुवार पेठेतील कृष्णा हाईटस बिल्डिंगच्या टेरेसवरील खोलीमध्ये सुरु असलेल्या किशोर सातपुते (Kishor Satpute) याच्या जुगार अड्ड्यावर खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell Pune) छापा घातला. तेथे जुगार अड्डा चालविणारे व तीन पत्ती जुगार खेळणारे अशा १० जणांना अटक केली आहे.
शाहरुख अख्तर पठाण (वय ३०, रा. कासेवाडी, भवानी पेठ), ज्ञानेश्वर बालाजी यामजले (वय ३९, रा. संतोषनगर, कात्रज), साहिल इब्राहिम साठी (वय २१, रा. चव्हाणनगर), अरुण गोरखनाथ माने (वय ४५, रा. केशवनगर, धनकवडी), जीवन शिवाजी बडे (वय २६, रा. संभाजीनगर, कात्रज), अनंत सतीश खिंवसरा (वय ४४, रा. मार्केटयार्ड), अतुल रामभाऊ बोडके (वय ३५, रा. पिंपळे गुरव), मंगेश सुरेश परदेशी (वय ३७, रा. धनकवडी), विकी सुभाष बनसोडे (वय ३५, रा. पानमळा वसाहत, सिंहगड रोड), ओमकार जयराम जगताप (वय २६, रा. दांडेकर पुल, दत्तवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच किशोर बाळू सातपुते (रा. दांडेकर पुल) या जुगार अड्डा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार सयाजी चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील (API Abhijit Patil), विजयकुमार शिंदे (API Vijaykumar Shinde), पोलीस हवालदार सयाजी चव्हाण, नितीन कांबळे, गितांजली जांभुळकर, राजेंद्र लांडगे, मयुर भोकरे हे पेट्रोलिग करत असताना हवालदार सयाजी चव्हाण व मयुर भोकरे यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, कृष्णा हाईटसच्या टेरेसवरील खोलीत जुगार खेळत आहे. पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केल्यावर टेरेसवरील खोलीत काही जण तीन पत्ती जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी १० जणांना अटक करुन पत्त्याचा कॅट, रोख रक्कम असा १४ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. खडक पोलीस अधिक तपास करत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय