Pune Pimpri Chinchwad Crime News | सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नात कमी दागिने घातले या कारणावरुन उच्च भ्रु घरात होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. (Married Woman Suicide Case)

आसावरी अक्षय दळवी (वय २३, रा. लिओनारा सोसयटी, गोदरेज, म्हाळुंगे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी अक्षय अरविंद दळवी (वय २७, रा. भोसलेमळा, अयोध्यानगरी सोसायटी, सातारा), पुष्पा अरविंद दळवी (वय ४५) आणि पज्ञा राजेश शिर्के (वय ३४, रा. नेरुळ, नवी मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी आसावरी हिचा अक्षय दळवी याच्याशी डिसेबर २०२३ मध्ये विवाह झाला. लग्नानंतर काही दिवसातच लग्नात कमी दागिने घातले. तसेच इतर घरातील किरकोळ कारणावरुन आसावरी हिचा मानसिक, शारीरीक व आर्थिक छळ होऊ लागला.
या छळाला कंटाळून आसावरी हिने लिओनारा सोसायटीमधील घरात १७ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
तिचे धार्मिक कार्य पूर्ण झाल्यावर तिच्या आईने आता फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MVA CM Candidate Issue | शरद पवारांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाची मवाळ भूमिका; मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा हट्ट सोडला

Jaydeep Apte Arrest | शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेला अटक; जयदीप कसा पकडला गेला जाणून घ्या

Hadapsar Pune Crime News | अट्टल वाहनचोराकडून साडेबारा लाखांच्या तब्बल 24 दुचाकी हस्तगत; हडपसर पोलिसांची कामगिरी

Pune ACB Trap | 35 हजार रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

You may have missed