Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा फिक्स, त्यात उद्धव ठाकरे…”, फडणवीसांची टीका; म्हणाले – ” ठाकरेंना सोनिया गांधींनी फोटोही काढू दिला नाही”

Devendra Fadnavis Uddhav Thackeray

मुंबई: Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर आली असली तरी अद्याप महायुती व महाविकास आघाडीचा (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरलेला नाही. दरम्यान, ‘आमच्याकडे मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून वाद नाही’, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

फडणवीस म्हणाले , ” मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा आणि तोही माझा असावा, यासाठी उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे आम्ही दिल्लीत जातो. तरीही आमच्या दिल्ली भेटीवर टीका केली जाते. उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत असताना त्यांनी सोनिया गांधींबरोबर चर्चा केली. पण या बैठकीचा फोटो काढण्याची परवानगी गांधींनी दिली नाही.

दिल्लीत उद्धव ठाकरेंच्या हाती काहीही लागले नाही. आता तर शरद पवारांनी स्पष्ट केले आहे की, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार नाही. त्यावर नाना पटोलेंनीही हीच री ओढली. उद्धव ठाकरेंच्या मनात जे होते, ते आता होताना शक्य दिसत नाही.

पण मला असे वाटते की, शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे? हे जवळजवळ शिजत आहे.
त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही.
मी शरद पवारांच्या डोक्यात कोण नाही, हे सांगू शकतो. पण शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदासाठी कोण आहे,
हे सांगणं फार कठीण आहे “, असे भाष्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed