Pune Crime News | सराईत मोबाईल चोरट्याला पाठलाग करुन पकडले; लुटमारीचे 12 हून अधिक गुन्हे दाखल

पुणे : Pune Crime News | मोबाईलवर बोलत जाणार्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून (Mobile Theft Case) घेऊन पळून जाणार्या सराईत चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी (Bund Garden Police) पाठलाग करुन पकडले. (Robbery Case)
शकील शब्बीर शेख (वय २२, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. शकील शेख हा सराईत चोरटा असून त्याला तडीपारही करण्यात आले होते.
याबाबत सार्थक किशोर जाधव (वय २५, रा. मोहननगर कॉलनी, धनकवडी) यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना पुणे रेल्वे स्टेशनसमोरील मुख्य रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुणे रेल्वे स्टेशनसमोरील (Pune Railway Station) मुख्य रस्त्यावरुन मोबाईलवर बोलत जात होते. यावेळी शकील शेख याने फिर्यादीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरुन तो पळून गेला. याची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. काही अंतरावर शकील शेख हा जाताना दिसला. तेव्हा पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले.
शकील शेख हा सराईत चोरटा असून पुणे स्टेशन, कोरेगाव पार्क (Koregaon Park), येरवडा (Yerawada),
विमाननगर (Viman Nagar) परिसरात लुटमारीचे १२ हून अधिक गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत.
शेख याला शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते.
त्या काळातही तो तडीपारीचा भंग करुन शहरात येऊन मोबाईल चोर्या करीत होता. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता अधिक तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा