Loni Kalbhor Pune Crime News | खालच्या जातीची असल्याने लग्नास नकार देऊन गर्भपात करविला; तरुणाविरुद्ध अॅट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल

पुणे : Loni Kalbhor Pune Crime News | तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्याबरोबर शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिल्यावर आई खालच्या जातीची असल्याचे कारण देऊन लग्नाला नकार दिला. तरुणीचा गर्भपात करविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका १९ वर्षाच्या तरुणीने लोणी काळभोर पोलिसांकडे (Loni Kalbhor Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संयोग संजय गायकवाड Sanyog Sanjay Gaikwad (रा. माळीमळा पार्टी, लोणी काळभोर) याच्यावर अॅट्रॉसिटीचा (Atrocity Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ८ ऑक्टोबर २०२२ ते ८ सप्टेंबर २०२४ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संयोग गायकवाड याचे धनकवडी (Dhankawadi) येथील शंकर महाराज मठ (Shankar Maharaj Math) येथे सीसीटीव्ही कॅमेर्याचे दुकान आहे. संयोग गायकवाड याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून दुकानात त्यांच्याशी शारीरीक संबंध ठेवले.
त्यानंतर वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याशी संबंध ठेवले. त्यातून फिर्यादी या गर्भवती राहिल्यावर फिर्यादी यांची आई खालच्या समाजाच्या असल्याचे कारण सांगून त्यांच्याशी लग्न करण्यास नकार दिला. तसेच त्याने फिर्यादी यांचे गर्भातील १० आठवडे १५ दिवस वयाचे बाळाचा ऊरुळी कांचन येथील चिंतामणी हॉस्पिटलमध्ये गर्भपात करविला आहे. पोलीस उपनिरीक्षक नलावडे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा