Lonikand Pune Crime News | एन्जॉय ग्रुपच्या 7 जणांना जेरबंद करुन 7 पिस्तुले, 23 जिवंत काडतुसे जप्त; लोणीकंद पोलिसांची कामगिरी (Video)

पुणे / शिक्रापूर : सचिन धुमाळ – Lonikand Pune Crime News | पुणे : सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदाराला पूर्ववैमनस्यातून मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी एन्जॉय ग्रुपच्या (Enjoy Group Pune) ७ जणांना अटक केली. त्यांच्याकडून ७ पिस्तुल आणि तब्बल २३ जिवंत काडतुसे जप्त केली आहे. त्यातून पुढे होणार्या मोठ्या गुन्ह्यांना आळा घालण्यात लोणीकंद पोलिसांना (Lonikand Police) यश आले आहे. (Pistol Seized)
शुभम ऊर्फ मॅटर अनिल जगताप (वय २७), सुमित उत्तरेश्वर जाधव (वय २६), अमित म्हस्कु अवचरे (वय २७), ओंकार ऊर्फ भैय्या अशोक जाधव (वय २४), अजय ऊर्फ सागर बाळकृष्ण हेगडे (वय २७), राज बसवराज स्वामी (वय २६), लतिकेश गौतम पोळ (वय २२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
https://www.instagram.com/reel/C_qI0cCp6ml/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
फिर्यादी व साक्षीदार हे सराईत गुन्हेगार असून दहीहंडीचा कार्यक्रम संपवून ते परत येत असताना त्यांचा विरोधक सुमित उत्तरेश्वर जाधव व इतरांनी पूर्ववैमनस्यातून कोलवडी परिसरात त्यांच्यावर हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना तपासात हा गुन्हा हडपसर, स्वारगेट, लोहियानगर येथील एन्जॉय ग्रुपमधील सदस्यांनी केल्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने तपास पथकाने हडपसर, भेकराईनगर परिसरात तळ ठोकून एन्जॉय ग्रुपमधील सदस्यांची माहिती प्राप्त केली. त्यात ८ जणांची नावे निष्पन्न झाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांना मिळालेल्या बातमीनुसार शुभम जगातप व सुमित जाधव यांना मुंढवा परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे व पथकाने आरोपीकडे इतर साथीदारांबाबत विचारपूस करुन नवले ब्रीज परिसरात शोध घेऊन सापळा लावून इतर ५ जणांना पकडले. अमीत अवचरे व सागर हेगडे यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे २ पिस्टल व ९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपींना अटक करुन त्यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली. पोलीस कोठडी असताना आरोपीकडून देशी बनावटीचे ४ पिस्टल व १२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
या गुन्ह्याच्या तपासात ६ आरोपीना अटक करुन त्यांच्या ७ पिस्टल व एकूण २३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. गुन्हा करण्यासाठी वापरलेली दोन वाहने, ७ मोबाईल असा एकूण ९ लाख १४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar),
सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (IPS Manoj Patil),
पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव (DCP Himmat Jadhav), सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे (ACP Pranjali Sonawane)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड (PI Pandit Rejitwad ),
सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे (API Ravindra Godse), पोलीस अंमलदार संदीप तिकोणे,
कैलास साळुंके, स्वप्निल जाधव, अजित फरांदे, सागर जगताप, अमोल ढोणे, शुभम चिनके,
साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, मल्हारी सपुरे, दीपक कोकरे, सुधीर शिवले यांनी केली आहे. (Lonikand Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा